Refurbished Products रिफर्बिश्ड म्हणजे काय?

रिफर्बिश्ड उत्पादने म्हणजे काय?

आपण बऱ्याचदा टीव्ही किंवा इतर मीडियावर रिफर्बिश्ड उत्पादनांच्या जाहिराती बघत असतो. काही विक्रेते याला Renowened म्हणून सुद्धा विकतात. पण बऱ्याचदा रिफर्बिश्ड उत्पादने घेण्याबाबत आपल्या मनात शंका असतात. याचे मूळ कारण की रिफर्बिश्ड आणि जुने/वापरलेली वस्तू यातील फरक आपल्याला नीटसा माहित नसतो तसेच यावर वॉरंटी किती आणि कश्या स्वरूपाची मिळेल याबद्दल आपल्या मनात अनेक शंका असतात. आज आपण याच प्रशनांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. उत्पादने रिफर्बिश्ड म्हणून का विकली जातात? हा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला पडतो की ‘नव्यासारखे’ असलेले एखादे उत्पादन लक्षणीयरीत्या कमी किमतीत का विकले जाते? यासाठी आपण एक…