ASUS ROG Phone 3, एक दमदार गेमिंग फोन

तैवानी मोबाईल कंपनी Asus ने ASUS ROG Phone 3 हा गेमिंग स्मार्टफोन(Gaming Smartphone)  बुधवारी 22 जुलै ला प्रदर्शित केला, आसुसचे या आधीचे ROG Phone 1 आणि ASUS ROG Phone 2 हे गेमर्सच्या पसंतीस उतरले होते. चला पाहूया या फोनमध्ये काय खास वैशिष्ट्ये आहेत. 

ASUS ROG Phone 3 ची वैशिष्ट्ये 

डिस्प्ले

या फोनला 6.59 इंचाचा AMOLED पॅनल डिस्प्ले असून तो 10 बिट HDR10+ सपोर्ट सह 140 हर्ट्झ एवढा रिफ्रेश रेटसह असेल. यामुळे आपल्याला व्हिडीओ पाहणे आणि गेम्स खेळणे अश्या मनोरंजक गोष्टींची अधिक मजा घेता येईल.

परफॉर्मन्स

परफॉर्मन्सच्या बाबतीत क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 865+ SoC 3.1GHz या तगड्या ऑक्टाकोर प्रोसेसरला अड्रेनो 650 हा जीपीयू आणि 8/12 GB रॅम यांची जोड असणार आहे त्यामुळे तुम्हाला गेम्स खेळताना कुठलीही अडचण येणार नाही एवढं निश्चित. हा फोन 5G या मोबाईल प्लॅटफॉर्मवर काम करणारा आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार कॅमेरा असून 64MP Sony IMX686 सेन्सर मध्ये f/1.8 या प्राथमिक कॅमेराला 13MP हा 125अंश वाईड अँगल सेन्सर, 5MP मॅक्रो सेन्सर असेल.
सेल्फीसाठी 24 MP सेन्सरअसून तुम्ही 8K७(7680 x 4320) 4K (3840 x 2160 HDR 6FPS, ७(7680 x 4320)(3840Slow Motion video (4K at 120 fps; 1080p at 240 / 120 fps; 720p at 480 fps) व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकाल. त्याचबरोबर आपण व्हिडीओ रेकॉर्ड करताना फ्रंट अथवा रिअर मायक्रोफोन निवडण्याची सुविधा असणार आहे.

बॅटरी

तुमच्या गेमिंगच्या गरजा ध्यानात ठेऊन या फोनला 6000mah क्षमतेची दमदार बॅटरी दिली असून चार्जिंगचा वेळ कमीत कमी व्हावा म्हणून 30W क्षमतेची क्विक चार्ज 4 तंत्रज्ञानासह चार्जिंगची सुविधा असणार आहे.

इतर महत्वाच्या बाबी

महत्वाचे म्हणजे यात USB-C पोर्ट असून “GameCool 3” हे कुलिंग सिस्टम असणारआहे तसेच समोरच्या बाजूने दोन स्पिकर्स, ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ 5.1 तसेच NFC सह नॉइज कॅन्सलेशनसाठी चार माईक असणार आहेत.

असेसरीज

याबरोबर तुम्हाला AeroActive Cooler 3, TwinView Dock 3, ROG ClipKunai 3 Gamepad, Mobile Desktop Dock सारख्या अधिकच्या असेसरीज जोडून गेमिंग अधिक सुकर आणि मजेदार करता येईल. यातील काही असेसरीज तुम्हाला अधिकच्या विकत घ्याव्या लागतील.

ASUS ROG Phone 3, असेसरीज
ASUS ROG Phone 3, असेसरीज

ASUS ROG Phone 3 Price

याची किंमत रु. 49,999/- (8GB RAM +128GB) ने सुरु होत असून 12GB+256GB मेमरी क्षमता असलेल्या मोबाईल ची किंमत ही रु.57999/- असणार आहे.
हे दोन्ही मोबाईल फोन हे भारतात खरेदीसाठी 6 ऑगस्ट पासून फ्लिपकार्ट या इ कॉमर्स वेबसाईट्सवर उपलब्ध होतील.

ASUS ROG Phone 3 खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा

Read Also
Redmi Note 9 (रेडमी नोट 9) Launch Date 21 July 2020. and Canon EOS 5D च्या फॅन्ससाठी वाईट बातमी

Related posts

Leave a Comment