Canon EOS 5D च्या फॅन्ससाठी वाईट बातमी

जर तुम्ही Canon EOS 5D Mark IV वरून Mark V वर अपग्रेड करायचा विचार करीत असाल, किंवा पहिल्यांदाच  Canon EOS 5D सिरीज मधला कॅमेरा घ्यायचा म्हणून 5D Mark V ची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी उदास करणारी असू शकते. कारण कॅनन ने त्यांचे 5D कॅमेराचे पुढचे व्हर्जन रद्द करण्याचा घाट घातला असल्याचे समजतेय आणि हि नक्कीच Canon EOS 5D च्या फॅन्ससाठी वाईट बातमी आहे. 

खरंतर कॅनन 5D Mark V वर काम करत असल्याच्या बातम्या ऑक्टोबर २०१९ मध्ये येत होत्या. पण मिररलेस कॅमेराकडे वाढणारा लोकांचा कल आणि या वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या कोविड-१९ च्या अर्थव्यवस्थेवरील प्रभावामुळे कॅननने हा कॅमेरा आपल्या आगामी मॉडेल्समधून वगळल्याने समजते आहे.

जे काही फोटोग्राफर्स अजूनही मिररलेस ऐवजी DSLR ला पसंती देतात अश्या प्रकारच्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेऊन कदाचित Canon 5D व्यतिरिक्त इतर मॉडेल बाजारात आणेल पण त्याबद्दल अजूनतरी काही ठोस माहिती समोर आलेली नाही. 

Read Also: Intel or AMD कुठला प्रोसेसर निवडावा?

Canon EOS 5D सिरीज:

हा कॅमेरा 2005 मध्ये लॉन्च झाला होता. आणि तो पहिला फुलफ्रेम कॅमेरा होता जो इतर DSLR च्या आकारात आला होता. कॅननचे 1D सीरिजचे कॅमेरे त्या मानाने मोठे आणि दोन ग्रिप्स सह येतात.

तसेच, Canon EOS 5D Mark II हा कॅननचा पहिला Canon EOS कॅमेरा होता जो व्हिडीओ रेकॉर्डिंग क्षमतेसह उपलब्ध झाला होता. 

सोनी बरोबरची स्पर्धा

कित्येक वर्षांपासून मिररलेस कॅमेराच्या क्षेत्रात दुर्लक्ष केल्याने या क्षेत्रात सोनीने कॅननला पिछाडीवर टाकले आहे. यथावकाश कॅननने त्यांचे लक्ष मिररलेस कॅमेरांकडे वळवत 2018 मध्ये आपला EOS R हा मिररलेस कॅमेरा बाजारात आणला. याचाच भाग म्हणून कॅननने आपले पूर्ण लक्ष EF लेन्स ऐवजी RF लेन्स कडे वळवले आहे.

हा कॅमेरा त्याच्या उत्तम कार्यक्षमतेमुळे फोटोग्राफर्समध्ये  प्रचंड लोकप्रिय होता. या कॅमेराच्या मागील १५ वर्षात ४ जनरेशन्स आल्या. या काळात निश्चितच या मॉडेलने आपले नाव कॅमेराच्या इतिहासात कायमच नोंदवून ठेवले आहे.

मिररलेस कॅमेरांच्या क्षेत्रात कॅननचे EOS R, EOS R5 आणि कमी किमतीत असलेला EOS RP हे आधीच लॉन्च केले होते. त्यानंतर जुलै 2020 मध्ये Canon EOS R6 लॉन्च केला आहे. हे कॅमेरे सोनीच्या मिररलेस कॅमेरांना नक्कीच टक्कर देऊ शकतील असा विश्वास कॅननला वाटतो.

Related posts

Leave a Comment