PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

PM KISAN पीएम किसान

PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना : योजनेचे स्वरूप : लघु व सीमांत शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने भारत सरकारने “प्रधान मंत्री किसन सन्मान निधि” या मध्यवर्ती योजनेस मान्यता दिली आहे. पी.एम.किसान ही योजना १.१२.२०१८ पासून चालू झाली असून. १०० टक्के केंद्र शासनाने राबवलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत केले जाणारे अर्थसहाय्य पूर्णपणे भारत सरकार करणार आहे. या योजनेचा लाभ २ हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या अल्पभूधारक तसेच अत्यल्भूधारक शेतकरी कुटुंबांना होणार असून प्रती वर्ष रू. ६०००/- उत्पन्न पाठबळ म्हणून देण्यात येणार आहे. राज्य शासन आणि केंद्र शासित प्रदेश…

Pradhan Mantri MUDRA Yojana प्रधान मंत्री मुद्रा योजना

Pradhan Mantri MUDRA Yojana प्रधान मंत्री मुद्रा योजना

केंद्र सरकारने छोटे उद्योग सुरू करण्यासाठी Pradhan Mantri MUDRA Yojana पंतप्रधान मुद्रा योजना सुरू केली आहे. याअंतर्गत लोकांना उद्यम सुरू करण्यासाठी लहान कर्ज दिले जाते. ही योजना एप्रिल २०१५ मध्ये सुरू झाली. या योजनेचे मुख्य उद्दीष्ट्य असे आहे की देशात असे खुप लोक आहेत ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु पैशाअभावी प्रारंभ होऊ शकत नाही, अशा लोकांसाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. २०२० च्या अंतर्गत लाभार्थी मुद्रा कर्ज घेऊन स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करू शकतात. आणि लोकांना या योजनेंतर्गत अतिशय सोप्या मार्गाने कर्ज उपलब्ध करुन देणे. प्रधान…

(CMEGP) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

(CMEGP) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम विषयी थोडक्यात माहिती नमस्कार मित्रांनो आम्ही आशा करतो की आपण या कोरोना/COVID19 मुळे आलेल्या संकटकाळात घरी सुरक्षित असाल. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे संकट आल्यानंतर काय करायचं याचा प्रश्न पडला असेल. तर बऱ्याच जणांच्या धोक्यात आलेल्या असतील किंवा नोकऱ्याही गेलेल्या असतील. तसेच व्यवसाय तोट्यात जाणे किंवा ते करणे जास्त कठीण किंवा कमी उत्पन्न देणारे झाले असेल.  अशावेळी जर आपल्या मनात कुठल्याही प्रकारचा नवा उद्योग करण्याचा विचार येत असेल तर संबंधित उद्योगासाठी शासनाच्या ज्या  विविध योजना आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आज आपण ज्या योजनेबद्दल माहिती…

उद्यम रजिस्ट्रेशन(Udyam Registration)

udyam registration

उद्यम रजिस्ट्रेशन(Udyam Registration) बद्दल महत्वाचे १० मुद्दे. एक जुलै २०२० पासून केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने महत्वाचे मानलेले उद्योग आधार हे प्रमाणपत्र रद्दबातल करून त्याजागी नवीन ‘उद्यम रजिस्ट्रेशन(Udyam Registration)’ची सुविधा सुरु केली आहे. या नव्या घोषणेनंतर खूप उद्योजकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण आले आहेत त्याचबरोबर ज्यांना नव्याने उद्योग सुरु करायचे आहेत तसेच सुरु केलेल्या उद्योगाची नोंदणी करायची आहे.  अश्या उद्योजकांच्या मनातही विविध शंका आहेत. चला तर बघुया उद्यम रजिस्ट्रेशनची प्रक्रिया काय आहे आणि उद्यम रजिस्ट्रेशनची आणि उद्योग आधार यांच्यात काय फरक आहे. १) उद्यम रजिस्ट्रेशन(Udyam Registration) कोणासाठी…

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास गट: कर्ज व्याज परतावा योजना  योजनेची काही वैशिष्ट्ये आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे सशक्तीकरण घडवून आणणे असे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे ध्येय आहे त्यासाठीच त्यांनी राज्यातील तरुणांसाठी छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान अंतर्गत विविध कर्ज योजना जाहीर केल्या आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत या महामंडळाच्या योजनांची अंमलबजावणी होते. महाराष्ट्र शासनाच्या ई-प्रशासन धोरणास अनुसरून दि. २१ जुलै २०१४…

Stand Up India स्टँड अप इंडिया योजना

Stand Up India स्टँड अप इंडिया योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०१६ मध्ये देशातील अनुसूचित जाती, जमातीतील तरुण आणि महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज देऊन उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहित करून ‘स्टँड अप इंडिया’ (Stand Up India) योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातुन महिला तसेच अनुसूचित जाती व जमातीमधील तरुण उद्योजक होऊ शकतील.   Stand Up India  योजनेची काही वैशिष्ट्ये   १. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती (SC )/ अनुसूचित जमाती(ST) आणि महिला उद्योजकांना  नवीन प्रकल्प किंवा ग्रीनफिल्ड प्रकल्पांसाठी दहा लाख रुपयांपासून  एक कोटी रुपयापर्यंतची  कर्जे दिली जातात.  स्टँड-अप इंडिया स्कीम: पात्रता             …