आता पैसे पाठवता येणार व्हॅट्सऍपवरून. लवकरच सुरु होतंय WhatsApp Payments.

आता पैसे पाठवता येणार व्हॅट्सऍपवरून. लवकरच सुरु होतंय WhatsApp Payments.

खूप अडथळ्यानंतर एकदाचे व्हाट्सएपच्या पेमेंट( WhatsApp Payments) सुविधेची सुरुवात आता भारतात होणार आहे. आजच व्हाट्सअप आणि फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबद्दल घोषणा केली आहे. व्हाट्सअपने यासाठी National Payments Corporation of India (NPCI) शी संलग्न होऊन Unified Payment Interface (UPI) आधारित वर आधारित पेमेंट सिस्टम चालू केली आहे. यामुळे आता केवळ व्हाट्सअप वापरून आपण भारतातील जवळजवळ  160 बॅंकांमधील खात्यात व्यवहार करणे शक्य होणारआहे. या सुविधेचा वापर करण्यासाठी आपल्याकडे स्वतःचे बँक खाते तसेच डेबिट कार्ड असणे आवश्यक आहे. ही सुविधा राबवण्यासाठी भारतातील चार आघाडीच्या बँका(ICICI Bank, HDFC Bank, Axis Bank, the…

आता व्हॅट्सऍपवर देखील करता येतील आपोआप डिलीट होणारे मेसेज‘Disappearing Messeges’. पहा पूर्ण प्रक्रिया.

‘Disappearing Messeges’ कसे पाठवावेत?

व्हाट्सएपच्या आपोआप डीलीट होणाऱ्या मेसेजचे‘(Disappearing Messeges) फिचर लवकरच चालू होत आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत हे फिचर सर्व युजर्सपर्यंत पोचलेले असेल.  हे मेसेज सात दिवसांपर्यंत आपल्या फोनमध्ये रहातील, त्यानंतर अपोआप डिलीट होतील. हे फिचर वयक्तिक चॅट तसेच ग्रुप चॅट साठीही उपलब्ध असेल. चला तर जाणून घेऊयात या सुविधेबाबत अधिक माहिती: एकदा का ‘Disappearing Messeges’ हे फिचर चालू केले कि त्यानंतर पाठवले जाणारे मेसेजेस हे सात दिवसानंतर डिलीट व्हायला सुरुवात होईल. हे फिचर आपल्याला प्रत्येक कॉन्टॅक्ट किंवा ग्रुपसाठी स्वतंत्रपणे चालू/बंद करता येईल. यामध्ये फोटो, व्हिडीओ आणि ऑडिओचंही समावेश असेल. पण, स्क्रिनशॉट काढणे…

मायक्रोमॅक्स in सीरिजचे दोन दमदार फोन लॉन्च.

Micromax In seies

मायक्रोमॅक्स या एकेकाळच्या लोकप्रिय भारतीय भारतीय ब्रॅण्डने पुन्हा एकदा चिनी कंपन्यांना पछाडण्याचा संकल्प करत भारतीय बाजारपेठेत पुनरागमन करण्याचे ठरवले आहे. मागची जवळजवळ चार वर्षे भारतीय बाजारपेठेतील पिछाडीवर असलेली मायक्रोमॅक्स आता पुन्हा एकदा ‘in’ या नव्या नावासह जोरदार कमबॅक करत आहे. खूप दिवसांपासून चर्चेत असलेल्या या ब्रॅण्डचे 2 नवे स्मार्टफोन्स आज लॉन्च झाले आहेत.  सादर स्मार्टफोन्सचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे स्मार्टफोन्स स्टॉक अँड्रॉइड प्रणालीवर चालणार असल्याने कुठल्याही प्रकारची अनावश्यक एप्स ग्राहकांच्या माथी मारली जाणार नाहीत. ज्यांना स्टॉक अँड्रॉइड प्रणाली वापरण्यास चांगली वाटते त्यांना या ब्रँड मुळे ते आता कमी किमतीतही वापरणे…

7/12 उतारा म्हणजे काय? कसा पाहावा?

7/12 उतारा कसा वाचावा

आपण जर शेतकरी असाल तर 7/12 उताऱ्याची गरज आपल्याला नेहमीच पडत असेल. त्याचबरोबर कुठलीही शेतजमीन घ्यायची असल्यास आपण सगळ्यात आधी 7/12 उतारा पाहात असतो जेणेकरून आपल्याला संबंधित जमिनीची पूर्ण माहिती मिळते तसेच त्या जमिनीसंबंधी असलेल्या विविध कायदेशीर बाबी जसे की कर्ज, वारसदार यांचीही माहिती मिळते.  बऱ्याच जणांना 7/12 Extract मध्ये कुठल्या बाबी उल्लेखलेल्या असतात तसेच त्या कुठे नमूद केलेल्या असतात हे माहित नसते.  आज आपण अश्याच काही बाबींबद्दल जाणून घेणार आहोत. यात तुम्हाला पडलेल्या पुढील प्रश्नांचा समावेश आहे.  7/12 उतारा म्हणजे काय (What is 7/12 Extract)? 7/12 उतारा कसा पाहावा/डाउनलोड…

Refurbished Products रिफर्बिश्ड म्हणजे काय?

रिफर्बिश्ड उत्पादने म्हणजे काय?

आपण बऱ्याचदा टीव्ही किंवा इतर मीडियावर रिफर्बिश्ड उत्पादनांच्या जाहिराती बघत असतो. काही विक्रेते याला Renowened म्हणून सुद्धा विकतात. पण बऱ्याचदा रिफर्बिश्ड उत्पादने घेण्याबाबत आपल्या मनात शंका असतात. याचे मूळ कारण की रिफर्बिश्ड आणि जुने/वापरलेली वस्तू यातील फरक आपल्याला नीटसा माहित नसतो तसेच यावर वॉरंटी किती आणि कश्या स्वरूपाची मिळेल याबद्दल आपल्या मनात अनेक शंका असतात. आज आपण याच प्रशनांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. उत्पादने रिफर्बिश्ड म्हणून का विकली जातात? हा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला पडतो की ‘नव्यासारखे’ असलेले एखादे उत्पादन लक्षणीयरीत्या कमी किमतीत का विकले जाते? यासाठी आपण एक…

नोकरी शोधताय? Google Kormo Jobs करील मदत.

गूगल चं बहुचर्चित Kormo Jobs ॲप भारतात सादर! बुधवार 19 ऑगस्ट रोजी गुगलने त्यांचं बहुचर्चित Kormo Jobs App भारतात लॉन्च केलं. या ॲप्लिकेशन मुळे नोकरी शोधणाऱ्यांना नोकरी शोधणं आणि अर्ज करणं सोपं होईल. Kromo Jobs एप्लीकेशन गुगलने 2018 मध्ये बांगलादेश मध्ये लॉन्च केलं होतं त्यानंतर हे ॲप इंडोनेशियात लॉंच केलं. गेल्याच वर्षी गुगल पे मध्ये जॉब स्पॉट या नावाने यातली काही फीचर्स देण्यात आली होती. मात्र आता फॉर्म अधिकच्या फीचर्स सह Kromo Jobs हे वेगळं ॲप लॉन्च करण्यात आलं आहे. या ॲप मध्ये लोकेशन नुसार नोकरीचा शोध, रियल टाइम ट्रॅकिंग,…

SSC/HSC दहावी बारावीचे मार्कशीट कसे मिळवावे?

How to download SSC/HSC Result or Marksheet? तुमचे महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळ दहावीचे किंवा बारावीचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र हरवले आहे? किंवा तुमच्या कंपनीत/कार्यालयात नव्याने रुजू होणाऱ्या व्यक्तीची दहावी-बारावीची प्रमाणपत्रके तुम्हाला बोर्डाकडून तपासून घ्यायची आहेत? तर तुमच्यासाठी महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळाने ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ज्यांची प्रमाणपत्रे किंवा गुणपत्रके हरवली आहेत किंवा त्यांना त्यांच्या पीडीएफ स्वरूपात प्रति हव्या आहेत, अश्यांसाठी हि सुविधा खूप कामाची ठरेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल याची माहिती आपण आज या लेखात घेणार आहोत. आवश्यक माहिती या सुविधेचा…

(Google Virtual visiting cards) गुगलने आणले डिजिटल व्हिजिटिंग कार्ड!

Visiting Card

गुगलने अलीकडेच आपल्यासाठी एक नवी सुविधा सुरु केली आहे जिचे नाव आहे गूगल व्हर्च्युअल व्हिजिटिंग कार्ड्स. या कार्ड्सच्या मदतीने आपण आपले संपर्क तपशील तसेच सोशल मीडिया अकाउंट्सचे पोफाइल लिंक्स देता येतील जेणेकरून आपल्याशी संपर्क साधण्यासाठी लोकांना सोपे पडेल. या सुविधेचा फायदा व्यावसायिक आपल्या ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी चांगल्याप्रकारे करून घेऊ शकतात. त्याचबरोबर अनेक छोटे व्यावसायिक ज्यांची दुकानं किंवा ऑफिसेस नसून ते घरून काम करतात जसे की फोटोग्राफर्स किंवा फ्री लान्सर्स. चला पाहुयात गूगल व्हर्च्युअल व्हिजिटिंग कार्ड्स कसे बनवावे. सर्वप्रथम आपल्या फोनच्या इंटरनेट ब्रावजरमध्ये गूगल अकाउंटने लॉगिन करा. त्यानंतर गूगल सर्च मध्ये आपल्याच…

फोटोग्राफी शिकायचीय? हे Youtube Channels नक्की सबस्क्राईब करा.

तुम्हाला फोटोग्राफी शिकायचीय? किंवा तुम्ही फोटोग्राफर आहात आणि तुम्हाला त्यात आणखी कलात्मकता आणायची आहे? चला तर आज पाहुयात काही भारतीय फोटोग्राफी चॅनेल्स जे तुम्हाला फोटोग्राफी शिकण्यास आणि तुमची फोटोग्राफी अधिकाधिक कलात्मक करण्यासाठी कुठले Youtube Channels नक्की पाहावेत. एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे यात फक्त मराठी चॅनल्स नसून हिंदी आणि इंग्रजींतीलही चॅनल्स आहेत. हे चॅनल्स निवडताना फक्त त्यांची लोकप्रियता आणि व्ह्यूज लक्षात न घेता त्यांची विषयाची मांडणी व शिकवण्यातला सहजपणा हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला गेला आहे. Camzia हा चॅनल तुम्हाला सर्वप्रकारचे फोटोग्राफी ज्ञान मिळवण्यासाठी उत्तम आहे. मुख्य…