छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास गट: कर्ज व्याज परतावा योजना 

योजनेची काही वैशिष्ट्ये

आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे सशक्तीकरण घडवून आणणे असे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे ध्येय आहे त्यासाठीच त्यांनी राज्यातील तरुणांसाठी छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान अंतर्गत विविध कर्ज योजना जाहीर केल्या आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत या महामंडळाच्या योजनांची अंमलबजावणी होते.
महाराष्ट्र शासनाच्या ई-प्रशासन धोरणास अनुसरून दि. २१ जुलै २०१४ पासून लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या योजना राबवण्याची प्रक्रिया जलद, पारदर्शी आणि अधिक कार्यक्षम करण्यासठी ऑनलाईन वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. प्रस्तुत वेब पोर्टलवर कर्ज अर्ज ऑनलाईन भरणे, स्थळ पाहणीचा दिनांक निश्चित करणे, अर्जाची सध्यस्थिती तपासणे तसेच अर्जासाठी आवश्यक कागद पत्राचे नमुने व तत्सम माहिती उमेदवाराला एका क्लिक वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वेब पोर्टलवर असलेल्या माहितीचा योग्य अभ्यास करून कर्जासाठी अर्ज केल्यास स्वयंरोजगारासाठी कर्ज देण्याची प्रक्रिया विहित मूदतीत पूर्ण होईल यात शंका नाही.

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान योजनेसाठी आवश्यक पात्रता

१.आर्थिकद्रुष्ट्या मागास व इतर प्रवर्गास लाभ घेता येईल.
२.आर्थिक मागास ज्यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखाच्या आत आहे.
३. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष पुरुष व स्त्रीयांसाठी १८ ते ५५ वर्ष.
४. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.

योजनेत कुठल्या प्रकारची कर्ज उपलब्ध आहेत?

१. वैयक्तिक व्याज परतावा योजना

या मध्ये अर्जदाराला १० लाख रु. पर्यंत कर्ज मिळते.

२. गट व्याज परतावा योजना 

दोन व्यक्ती असल्यास २५ लाख कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
तीन व्यक्ती असल्यास ३५ लाख कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
चार व्यक्ती असल्यास ४५ लाख कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
पाच व त्यापेक्षा जास्त व्यक्ती असल्यास ५० लाख कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

३. गटप्रकल्प कर्ज योजना

कमीत कमी १० शेतकऱ्यांचा गट
FPO नोंदणी कपंनी अक्ट नुसार
शेतीपूरक व्यवसायासाठी १० लाख बिनव्याजी कर्ज

कर्जाचे व्याज दर काय आहेत?

१. या योजनेचा व्याज दर जास्तीत जास्त १२ % असेल.

कर्जाची परतफेड कालावधी

१. कर्जाची कमाल मुदत ७ वर्षे असेल.

कर्ज अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • कोटेशन
  • प्रकल्प अहवाल
  • जातीचे प्रमाणपत्र
  • व्यवसाय ठिकाणच्या जागेची कागदपत्रे किंवा भाडेकरार
  • शिक्षण / कौशल्य विकास प्रशिक्षण
  • बँक अकाऊंट

ऑनलाइन अर्ज कसा करावा ?

१. udyog.mahaswayam.gov.in या पोर्टलद्वारे कर्जासाठीऑनलाईन अर्ज करू शकता.
२. अर्ज करताना आपली सर्व माहिती व्यवस्थित भरणे गरजेचं आहे. नोंदणीसाठी इथे क्लिक करा.
३. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करूनच आपल्याला कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
४. आपला आयडी सेव्ह करून ठेवायचा आहे.
५. अर्ज केल्यानंतर आपल्याला पडताळणीसाठी महामंडळाकडून संपर्क केला जाईल.
६. पडताळणी पूर्ण झाल्यावर आपलं कर्ज मंजूर होईल.

Related posts

Leave a Comment