(CMEGP) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

(CMEGP) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम विषयी थोडक्यात माहिती

नमस्कार मित्रांनो आम्ही आशा करतो की आपण या कोरोना/COVID19 मुळे आलेल्या संकटकाळात घरी सुरक्षित असाल. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे संकट आल्यानंतर काय करायचं याचा प्रश्न पडला असेल. तर बऱ्याच जणांच्या धोक्यात आलेल्या असतील किंवा नोकऱ्याही गेलेल्या असतील. तसेच व्यवसाय तोट्यात जाणे किंवा ते करणे जास्त कठीण किंवा कमी उत्पन्न देणारे झाले असेल.  अशावेळी जर आपल्या मनात कुठल्याही प्रकारचा नवा उद्योग करण्याचा विचार येत असेल तर संबंधित उद्योगासाठी शासनाच्या ज्या  विविध योजना आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आज आपण ज्या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत त्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम(Chief Minister Employment Generation Program or CMEGP) सदर योजनेचा लाभ घेऊन तुम्ही राज्य शासनाकडून 1 लाख ते 50 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता आणि आपल्या पंखांना बळ देऊन नवी भरारी घेऊ शकता. 

चला तर मग पाहूया या योजनेबद्दल सविस्तर माहिती

सादर योजनेअंतर्गत आपण आपल्या उद्योगासाठी 1 ते 50 लाख पर्यंत कर्ज घेऊ शकता. ही योजना महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयातर्फे महाराष्ट्र राज्यातील सर्व  जिल्ह्यातील जिल्हा उद्योग केंद्रांमार्फत राबवली जाते. 

या योजनेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रापुरते असून योजनेचे संकेतस्थळ वर जाऊन आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यासाठी CMEGP Yojana इथे क्लिक करा.

(CMEGP) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

(CMEGP) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता :-

१) तुमचे वय 18 ते 45 असणे गरजेचे आहे. यामध्ये अ जा /अ ज/ महिला / माजी सैनिक यांना कमाल वयोमर्यादेत ५ वर्षे सूट देण्यात आली आहे.

२)  सदर योजनेअंतर्गत उत्पादन क्षेत्रातील(Manufacturing Sector) उद्योगासाठी  जास्तीत जास्त प्रकल्प मर्यादा 50 लाख असून सेवा क्षेत्रातील(Service Sector) उद्योगासाठी  जास्तीत जास्त प्रकल्प मर्यादा 50 लाख असेल. 

३) आवश्यक शैक्षणिक पात्रता

(अ ) प्रकल्प रु 10 ते 25 लाखासाठी 7 वी पास

(ब) प्रकल्प रु 25 ते 50 लाखासाठी 10 वी पास

सदर अर्जाबरोबरच आपणास प्रकल्प अहवाल सादर करावा लागणार असून तो त्याचे निकष पुढील प्रमाणे असतील. 

स्थिर भांडवलमशीनरी रक्कम कमीत कमी 50%
इमारत बांधकामजास्तीत जास्त  20% 
खेळते भांडवलजास्तीत जास्त  30%
स्वगुंतवणूक5 ते 10%
अनुदान मर्यादा(Subsidy)15 ते 35 % (30% सर्व महिलांसाठी अनुदान राखीव)(20% SC/ST साठी अनुदान राखीव)
पात्र मालकी घटकवैयक्तिक, भागीदारी, तसेच बचत गट

सदर योजना ही नवीन स्थापन होणाऱ्या उद्योगासाठी असून  मराठी लिहिता, वाचता आणि बोलता येणे बंधनकारक आहे. 

ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारी विहित कागदपत्रे

 • पासपोर्ट साइज फोटो
 • आधार कार्ड
 • शैक्षणीक पात्रता प्रमाणपत्र (आपले शिक्षण किती झाले याचा पुरावा जसे 10 वी ,12वी, पदवीचे गुणपत्रक )
 • अर्जदार अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातींपैकी असल्यास जात प्रमाणपत्र. 
 • जन्मतारखेचा पुरावा (जन्म दाखला /शाळा सोडल्याचा दाखला / डोमिसीयल सर्टिफिकेट)
 • हमीपत्र  (Undertaking Form ) वेबसाईटवर मेनू मध्ये मिळेल किंवा आपण लेखाच्या खाली दिलेल्या लिंकवरून मिळवू शकता. 
 • प्रकल्प अहवाल(Project Report) आपण येथे क्लिक करून मिळवू शकता. 
 • माजी सैनिक, अपंग सारख्या विशेष प्रवर्गासाठी संबंधित प्रमाणपत्र. 
 • अर्जदाराने REDP/EDP/SDP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्र. 
 • आपण उद्योग सुरु करणार असाल त्या गावाची लोकसंख्या 20000 पेक्षा कमी लोकसंख्या असल्यास  लोकसंख्याचा दाखला. 
 • भागीदारी उद्योगासाठी i) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र/ Ii)अधिकार पत्र,घटना,

वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ http://maha-cmegp.gov.in सदर संकेत स्थळाला भेट दयावी व आजच संकेतस्थळावर अर्ज दाखल करावेत.

सदर योजना ही एक कुटुंब एक लाभार्थी या तत्वावर राबवली जाणार असल्याने एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.

आम्ही अशा करतो की ही माहिती आपल्याला संबंधित योजनेचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त पडेल. आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येत असल्यास किंवा काही शंका असल्यास आपण आपले प्रश्न लेखाच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता.

या योजनेचा शासन नियम पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

या योजनेबद्दल जाणून घेण्यासाठी जिल्हानिहाय संपर्क क्रमांक येथे क्लिक करून मिळावा

इतर योजना :

Related posts

2 Thoughts to “(CMEGP) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम”

 1. nem295231krya

  mss295231uttjr 800OyCP vAFn 4pk7JCT

 2. nam295231flebno

  mss295231ngkyt sXpJQ2l dxbJ 9SNwJXo

Leave a Comment