नोकरी शोधताय? Google Kormo Jobs करील मदत.

गूगल चं बहुचर्चित Kormo Jobs ॲप भारतात सादर!

बुधवार 19 ऑगस्ट रोजी गुगलने त्यांचं बहुचर्चित Kormo Jobs App भारतात लॉन्च केलं. या ॲप्लिकेशन मुळे नोकरी शोधणाऱ्यांना नोकरी शोधणं आणि अर्ज करणं सोपं होईल.

Kromo Jobs एप्लीकेशन गुगलने 2018 मध्ये बांगलादेश मध्ये लॉन्च केलं होतं त्यानंतर हे ॲप इंडोनेशियात लॉंच केलं. गेल्याच वर्षी गुगल पे मध्ये जॉब स्पॉट या नावाने यातली काही फीचर्स देण्यात आली होती. मात्र आता फॉर्म अधिकच्या फीचर्स सह Kromo Jobs हे वेगळं ॲप लॉन्च करण्यात आलं आहे.

या ॲप मध्ये लोकेशन नुसार नोकरीचा शोध, रियल टाइम ट्रॅकिंग, इन-ॲप मुलाखत शेड्युल करणे, बायोडेटा बनवणे आणि कौशल्य विकासासाठी साधनं अशा विविध सोयी आहेत.

Zomato आणि Dunzo सारख्या कंपन्यांनी 20 लाखांहून अधिक नोकऱ्या Kormo वर पोस्ट केल्या आहेत. सध्या मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यासह एकूण दहा शहरांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी हे ॲप उपलब्ध आहे.

आज आपण हे ॲप कसे वापरावे याची माहिती मिळवूया 

  1. Kormo Jobs ॲप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
  2. एकदा हे ॲप इन्स्टॉल झाले की उघडल्यावर तुम्हाला तुमचा Gmail अकाउंट निवडायचा आहे.
  3. त्यानंतर तुमच्या कामाशी/शिक्षणाशी संबंधित क्षेत्र निवडून Continue करायचे आहे.
  4. आता लगेच तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील नोकरीच्या उपलब्ध असलेल्या संधींबद्दल एक लिस्ट दिसेल. यात तुम्ही निवडलेल्या एकापेक्षा जास्त क्षेत्राचे व्यवस्थित वर्गीकरण केलेले दिसेल. पण लगेच आपण आपल्याला आवडलेल्या नोकरीसाठी अर्ज न करता पुढील गोष्टींची पूर्तता केल्यास नक्कीच फायदा होईल.
  5. स्क्रीनवर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असलेल्या Your Profile या बटनावर टॅप करून आपण आधी आपले प्रोफाइल म्हणजेच शैक्षणिक व व्यावसायिक तपशील भरायचे आहेत.
  6. तुमचे रेझ्युमे बनवलेले असेल तर तुम्ही इथे अपलोड करू शकता. हे ॲप आपोआप तुमचे तपशील प्रोफाइलमध्ये अंतर्भूत करेल किंवा तुम्ही स्वतःही हे तपशील भरू शकता.
  7. सर्वप्रथम Add work experience या विभागात आपण याआधी केलेल्या कामांचा/नोकऱ्यांचा तपशील व्यवस्थित भरा.
  8. त्यानंतर Add education या विभागात आपले पूर्ण शैक्षणिक तपशील भरा. 
  9. आता तुमची सर्व माहिती भरून झाली असेल तर नोकऱ्यांच्या यादीतील तुम्हाला योग्य वाटणाऱ्या नोकरीच्या पर्यायाला निवडा. इथे तुम्हाला त्या नोकरीसंदर्भात  पूर्ण माहिती मिळेल. आणि त्याखाली Apply हे बटन दिसेल. या बटनाला टॅप केले की त्या नोकरीसाठी तुमचा अर्ज संबंधित कार्यालयाला गेलेला असेल. यापुढील कार्यवाही संबंधिक कार्यालयाकडून केली जाईल.

Related posts

Leave a Comment