(Google Virtual visiting cards) गुगलने आणले डिजिटल व्हिजिटिंग कार्ड!

Visiting Card

गुगलने अलीकडेच आपल्यासाठी एक नवी सुविधा सुरु केली आहे जिचे नाव आहे गूगल व्हर्च्युअल व्हिजिटिंग कार्ड्स. या कार्ड्सच्या मदतीने आपण आपले संपर्क तपशील तसेच सोशल मीडिया अकाउंट्सचे पोफाइल लिंक्स देता येतील जेणेकरून आपल्याशी संपर्क साधण्यासाठी लोकांना सोपे पडेल.

या सुविधेचा फायदा व्यावसायिक आपल्या ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी चांगल्याप्रकारे करून घेऊ शकतात. त्याचबरोबर अनेक छोटे व्यावसायिक ज्यांची दुकानं किंवा ऑफिसेस नसून ते घरून काम करतात जसे की फोटोग्राफर्स किंवा फ्री लान्सर्स.
चला पाहुयात गूगल व्हर्च्युअल व्हिजिटिंग कार्ड्स कसे बनवावे.

  1. सर्वप्रथम आपल्या फोनच्या इंटरनेट ब्रावजरमध्ये गूगल अकाउंटने लॉगिन करा. त्यानंतर गूगल सर्च मध्ये आपल्याच नावाने सर्च करा. असे केल्याने गूगल आपल्याला Add Yourself to Google Search हा पर्याय दाखवील. यातील Get Started या बटनावर टॅप करा.

  2. वरील पद्धतीने जर Get Started हा पर्याय येत नसेल तर गूगलवर add me to search असे सर्च केले की हा पर्याय येईल.

  3. आता तुम्ही तुमचे नाव, पत्ता, शिक्षण, व्यवसायाचे नाव, त्याचबरोबर वेबसाईट तसेच सर्व सोशल मीडिया अकाउंट्स प्रोफाईलच्या लिंक इथे द्यायच्या आहेत.

  4. एक एक करून सगळ्या लिंक दिल्या की Save या बटनावर टॅप करा.


  5. आता तुमचे सर्च कार्ड यशस्वीरीत्या तयार झाले असल्याचा मेसेज येईल. यातच असलेल्या View Search Card या बटनावर टॅप करून तुम्ही आपले सर्च कार्ड कसे दिसेल ते पाहू शकाल आणि लवकरच ते गूगलवर तुमच्या नावाने सर्च करणाऱ्या युजर्सना दिसायला सुरुवात होईल.

Related posts

Leave a Comment