जियो बॅलन्स कसा तपासावा?

How to check Jio Balance

Read In English

आपल्या जीओ नंबरचा बॅलन्स तपासण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत आपण आज या पर्यायांचा आढावा घेणार आहोत

जीओचा मेन बॅलन्स कसा तपासावा?(How To Check JIO Main Balance)

तुम्ही तुमच्या फोनमध्ये *333# डायल केले की तुम्हाला तुमचा मेन बॅलन्स स्क्रीनवर दिसेल.

दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही MBAL हे शब्द 55333 या नंबरवर एसएमएस केल्यास तुम्हाला एक एसएमएस येईल ज्यात तुमच्या जीव बॅलन्सची माहिती असेल.

त्याचबरोबर आपला चालू टॅरीफ प्लॅन माहिती करून घेण्यासठी आपण 199 या क्रमांकावर MY PLAN हा एसएमएस करू शकता. उत्तरादाखल आलेल्या एसएमएस मध्ये आपल्याला आपल्या चालू टॅरिफ प्लॅनबद्दल माहिती मिळेल.

जीओचा प्लॅनची वैधता कशी तपासावी

आपल्या जीव प्लॅनची वैधता तपासण्यासाठी आपल्याला 1991 या क्रमांकावर फोन करता येईल. या क्रमांकावर फोन केल्यानंतर आपला फोन कट केला जाईल आणि उत्तरादाखल एक एसएमएस येईल ज्यात आपल्या प्लॅनच्या वैधतेविषयी पूर्ण माहिती असेल.

जिओ प्रीपेड बॅलन्स आणि व्हॅलिडिटी कशी तपासावी?(How To Check JIO Prepaid Balance and Validity)

आपल्या फोनवरून 199 या क्रमांकावर BAL असा एसएमएस केला की आपल्याला आलेल्या एसएमएस मध्ये आपल्याला प्रीपेड बॅलन्स आणि व्हॅलिडिटी बद्दल माहिती मिळेल.

ऑनलाईन बॅलन्स चेक करण्यासाठी काय करावे लागेल?(How To Check JIO Balance Online?)

यासाठी आपण jio.com या वेबसाईटवर जाऊ शकता किंवा इथे क्लिक करू शकता. या वेबसाईटवर गेल्यावर आपल्याला आपल्या मोबाईल क्रमांक आणि ओटीपी क्रमांक यांच्या साहायाने लॉगिन करता येईल. इथे आपल्याला आपल्या मोबाईल क्रमांकाच्या सर्वप्रकारच्या बॅलन्स संबंधी माहिती मिळेल.

याचबरोबर आपण जिओचे अधिकृत माय जीओ हे ऍप वापरून वर दिलेल्या सर्व प्रकारचे बॅलन्स तपासू शकता.

याव्यतिरिक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण जिओ सिम वरून केलेले फोन तसेच एसएमएस हे देखील जिओच्या 4G डेटा वापरामध्ये गणले जातात. त्याचबरोबर आपल्या दैनंदिन डेटाच्या कोट्यामधून आपण किती डेटा वापरला आहे याची माहिती 50%, 90% तसेच 100% डेटा वापरल्यावर जीओ आपल्याला एसएमएस द्वारे कळवत असते.

Read Also:

Related posts

Leave a Comment