Intel or AMD कुठला प्रोसेसर निवडावा?

Intel or AMD कुठला प्रोसेसर निवडावा?

कंप्यूटर म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ज्याला आपण सीपीयू किंवा प्रोसेसर म्हणतो. प्रोसेसर म्हणजे इंटेल या कंपनीची प्रोसेसर असे आत्तापर्यंत गणित असायचं. पण आता बरेच जण ए.  एम. डी. या प्रोसेसर कडे सुद्धा वळताना दिसत आहेत. पण ज्यांनी आतापर्यंत ए. एम. डी. पप्रोसेसर वापरलेला नाही त्यांच्या मनात पहिला प्रश्न पडतो की हा प्रोसेसर घेऊन आपल्याला नक्की फायदा होईल का? खास करून त्यांच्या कम्प्युटरसाठी चे बजेट कमी असते अशांना हा प्रश्न जास्त सतावतो कारणे इंटेल पेक्षा ए. एम. डी.  या ब्रँडचे  प्रोसेसर स्वस्त आहेत पण मनात शंका राहते की थोडे पैसे वाचवण्यासाठी आपल्या कॉम्प्युटरच्या परफॉर्मन्स वर  काही परिणाम होईल का चला तर मग  शोधूया आपल्या याच प्रश्नांची उत्तरे Intel or AMD कुठला प्रोसेसर निवडावा?

 खरंतर वेग आणि पॉवर कंझम्पशन या बाबतीत इंटेल नेहमीच ए.एम.डी. च्या पुढे राहिला आहे आणि मागची बरीच वर्षे इंटेल या ब्रँडने कम्प्युटरच्या प्रोसेसर बाजारपेठ काबीज केली होती. परंतु जेव्हापासून ए. एम. डी. ने रायझेन सीरिजचे प्रोसेसर बाजारात उतरवले तेव्हापासून त्यांनी  इंटेल ला जोरदार टक्कर द्यायला सुरुवात केली आहे त्यामुळेच आता Intel or AMD कुठला प्रोसेसर निवडावा? हा प्रश्न जास्त महत्वाचा ठरतो. अगदी विचारायचं तर  ए. एम. डी.चा Ryzen 9 3950X एक हा पहिलाच 16 कोअर्स आणि 32 थ्रेड असलेल्या प्रोसेसर बाजारात उतरविला गेला याउलट इंटेल चा i9-9900K हा प्रोसेसर फक्त आठ कोण आणि 16 थ्रेड वर काम करतो.  परंतु फक्त आकड्यांवर फक्त आकड्यांवर न जाता आपण पाहू या की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये दोन्ही प्रोसेसर दोन्ही प्रोसेसर कशाप्रकारे काम करतात. 

स्पीड

स्पीडच्या बाबतीत इंटेल प्रोसेसर ए.एम.डी. च्या कायम पुढे राहिलेत प्रोसेसरचा वेग हा मुख्यतः गिगाहर्टझ(GHz) मध्ये  मोजला जातो आणि इंटेल या बाबतीत कायम ए.एम.डी.च्यापुढे राहिलेले आहे. इंटेलचे प्रोसेसर हे क्लॉक स्पीड मध्ये पुढे असले तरी आता पाहायला गेलं तर कोरची संख्या यावर सुद्धा कम्प्युटरचा वेग अवलंबून असतो. जास्त क्लॉक स्पीडलाला ए.एम.डी.चे उत्तर म्हणजे कोर्सची संख्या होय. एमडी कायमच स्पीड पेक्षा कोर्स संख्येला महत्त्व देत आलेली आहे

दोघांच्या कामाच्या पद्धतीत आणखी एक मुख्य फरक हा आहे की इंटेल प्रोसेसर्स  कमी कोअरला चालत असल्यामुळे ते कमी पॉवरवर चालतात याउलट ए.एम.डी.च्या प्रोसेसरला जास्त पवार लागते. डेस्कटॉप साठी याने जास्त फरक पडत नसेल पण लॅपटॉप साठी मात्र याचा खूप फरक पडतो त्यामुळे जर तुम्हाला एक वेगवान प्रोसेसर त्याचबरोबर तो कमी पॉवर घेणारा हवा असेल तर या बाबतीत तुम्हाला इंटेल हा चांगला पर्याय राहील. 

साभार: जिकबेंच

ओव्हरक्लॉकिंग

ओव्हरक्लॉकिंग केल्याने तुम्ही तुमच्या सीपीयू हा त्या कंपनीने ठरवलेल्या फ्रिक्वेन्सी रेट पेक्षा जास्त स्पीडने वापरू शकता. काही सीपीयू ना ओव्हरक्लॉकिंग करण्याची सोय उपलब्ध असली तरी काहीना मात्र ती सुविधा दिलेली नसते.  याबाबतीत ए.एम.डी. इंटेलला मागे टाकते कारण इंटेलचे सीपीयू हे शक्यतो अनलॉक असतात. त्यामुळे त्यांना ओव्हरक्लॉक करणे शक्य असते. ए.एम.डी.चा Ryzen 3 मॉडेल हा अगदी बेसिक असला तरीही तुम्ही जर त्याला सपोर्ट करणारा मदरबोर्ड वापरत असाल तर त्याला ओव्हरक्लॉक करता येतं. याउलट जर तुम्ही इंटेलचे प्रोसेसर वापरत असाल तर तुम्ही फक्त तेच प्रोसेसर ओव्हरक्लॉक करू शकता ज्याच्या सीरिजमध्ये K हे अक्षर शेवटला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट हे प्रोसेसर जास्त महाग पडतात. 

कोअर्सची संख्या

कोअर्सची संख्या तुमच्या सीपीयू च्या वेगावर  खूप मोठा परिणाम करू शकते. जेवढे जास्त कोअर तेवढे जास्त वेगवान काम तुमचा कम्प्युटर करू शकतो. ए.एम.डी. हा कायम कोअर्सच्या संख्येवर जोर देता आलेला ब्रँड आहे. इंटेलने  मात्र या गोष्टीवर हायपरथ्रेडिंग या तंत्राने मात केलेली आहे. हायपरथ्रेडिंग या तंत्राने सीपीयू ला फिजिकल कोअर्स पासून वर्चुअल कोअर्स मध्ये किंवा थ्रेडमध्ये विभागता येते. त्यामुळे मल्टिटास्किंग सोपे होते. उदाहरणार्थ इंटेलचा एखादा ४ कोर सीपीयू हा हायपरथ्रेडिंग च्या मदतीने 8 थ्रेड मध्ये काम करतो. 

एंट्री लेव्हल प्रोसेसर च्या बाबतीत ए.एम.डी. आणि इंटेल दोन्ही तोडीस तोड काम करतात. जसे की इंटेलचा i3 आणि ए.एम.डी. चा Ryzen3 हे दोन्ही 4 कोअर वर काम करतात त्याचप्रमाणे हाय एन्ड डेस्कटॉप मॉडेल्समध्ये सुद्धा Ryzen थ्रेडरीपर  मॉडेल 08,12 आणि 16 फिजिकल कोअर्स वर काम करतात. त्याउलट इंटेलचे i9  मॉडेल 10 ते 18 पर्यंत फिजिकल कोअर्स वर काम करतात.

परफॉर्मन्स

जर तुम्ही इंटेल आणि ए.एम.डी.ची तुलना केली तर मल्टिटास्किंगच्या बाबतीत ए.एम.डी.चे सीपीयू हे इंटेल  पेक्षा सरस ठरतात. याउलट जर तुम्ही सिंगल वर्क बेस्ड काम करायची करणार असाल तर इंटेल सरस ठरते.  तुम्हाला जर व्हिडिओ एडिटिंग किंवा फोटो एडिटिंग करायचे असेल तर इंटेल प्रोसेसर हे उत्तम काम करतील. याउलट जर तुम्हाला तुमचा कम्प्युटर हा थ्रीडी व्हिडिओ बनवणारे सॉफ्टवेअर वापरायचे असतील तर मात्र तुम्हाला ए.एम.डी. प्रोसेसर जास्त चांगला परफॉर्मन्स देईल. 

तुम्हाला जर ऑफिसची दैनंदिन कामे जसे की मायक्रोसॉफ्ट ऑफिस सारखे सॉफ्टवेअर वापरायचे असतील तर मात्र ए.एम.डी. प्रोसेसर तुम्हाला जास्त सोयीस्कर पडेल. झिप फाईल कॉम्प्रेस करणे तसेच मायक्रोसॉफ्ट एक्सेल वर  मोठ्या स्प्रेडशीट फाईल तयार करणे यासारख्या गोष्टींसाठी Ryzen सिरीज ही कायम इंटेलच्या समतुल्य प्रोसेसर्सना  मागे टाकते. 

किंमत

किंमतीच्या बाबतीत ए.एम.डी. कायमच इंटेलपेक्षा सरस ठरते. एकाच लेव्हलवर स्पिड देणारे दोन्ही कंपन्यांचे प्रोसेसर पाहिले तर ए.एम.डी.चे  प्रोसेसर हे नेहमी इंटरच्या त्याच तोडीस तोड परफॉर्मन्स देऊनही स्वस्त असतात.  उदाहरण द्यायचं झालं AMD Ryzen 5 2600X Processor with Wraith Spire Cooler प्रोसेसर हा त्याच्यावर फक्त रु. 13699/- मध्ये मिळतो. या उलट त्याचा तोडीस तोड i5 9600K रु. 21900/-मध्ये विकत मिळतो. हायर प्रोसेसर मध्ये सुद्धा Core i9-9900K रु. 59800/- येतो या उलट ए.एम.डी.चा त्याच्या तोडीस तोड परफॉर्मन्स देणारा Ryzen 9 3900X हा प्रोसेसर रु. 49999/- मध्ये मिळतो. 

वरील विश्लेषणावरून तुम्हाला तुमच्या गरजेनुसार कोणता प्रोसेसर घ्यायचा याची माहिती अली असेलच. आपल्या मनात अजून काही शंका असल्यास आपण त्या कमेंटबॉक्स मध्ये विचारू शकता. 

*वरील किमती या वेळेनुरूप बदलू शकतात. 

(SSD vs HDD) तुमच्या कम्प्युटरचा वेग खूप कमी झालाय का? मग हे नक्की वाचा

Related posts

Leave a Comment