मायक्रोमॅक्स in सीरिजचे दोन दमदार फोन लॉन्च.

Micromax In seies

मायक्रोमॅक्स या एकेकाळच्या लोकप्रिय भारतीय भारतीय ब्रॅण्डने पुन्हा एकदा चिनी कंपन्यांना पछाडण्याचा संकल्प करत भारतीय बाजारपेठेत पुनरागमन करण्याचे ठरवले आहे. मागची जवळजवळ चार वर्षे भारतीय बाजारपेठेतील पिछाडीवर असलेली मायक्रोमॅक्स आता पुन्हा एकदा ‘in’ या नव्या नावासह जोरदार कमबॅक करत आहे.

खूप दिवसांपासून चर्चेत असलेल्या या ब्रॅण्डचे 2 नवे स्मार्टफोन्स आज लॉन्च झाले आहेत. 

सादर स्मार्टफोन्सचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे स्मार्टफोन्स स्टॉक अँड्रॉइड प्रणालीवर चालणार असल्याने कुठल्याही प्रकारची अनावश्यक एप्स ग्राहकांच्या माथी मारली जाणार नाहीत. ज्यांना स्टॉक अँड्रॉइड प्रणाली वापरण्यास चांगली वाटते त्यांना या ब्रँड मुळे ते आता कमी किमतीतही वापरणे सहज शक्य होणार आहे.

मायक्रोमॅक्सने आपले in 1b आणि in note 1 हे दोन मॉडेल लॉन्च केले असून आपल्या श्रेणीमध्ये अत्यंत स्पर्धात्मक किमतीत जास्तीत जास्त फीचर्सचा यात समावेश केला आहे.

in 1b

प्रोसेसर आणि रॅम:

या फोनमध्ये MTK G35 हा प्रोसेसर असून तो 2.3 गिगाहर्टझ वर काम करेल. त्याचबरोबर PowerVR GE8320 हा जीपीयू आपल्याला मिळणार असून हा फोन 2GB आणि 4GB अश्या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.

डिस्प्ले:

या फोनला 6.67 इंचाचा डिस्प्ले असून याचे रिझोल्युशन 1080×2400 (FHD+) आहे. हा डिस्प्ले 20:9 या प्रमाणात असणार आहे. 

फ्रंट कॅमेरासाठी याला मिनी ड्रॉप स्टाईल नॉच देण्यात आली आहे. 

कॅमेरा:

या फोनला मुख्य कॅमेरा हा 13 मेगापिक्सल आहे जो PDAF सह काम करील. त्याचबरोबर  2 मेगापिक्सल चा सेकंडरी कॅमेरा आहे. 

सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेल सेन्सर असलेला कॅमेरा वाईड अँगलसह देण्यात आला आहे.

बॅटरी:

हा फोन 5000mAh क्षमतेच्या बॅटरीसह उपलब्ध असून या किमतीच्या इतर फोन्स मध्ये नसणारे रिव्हर्स चार्जिंग तसेच सी-टाईप चार्जिंग पोर्ट यामध्ये दिलेले आहे. त्यामुळे चार्जिंग तसेच कम्प्युटरला डेटा ट्रान्स्फर कार्यासाखी कामे जलद गतीने होणार आहेत. मुख्य म्हणजे तुम्हाला 10 Watt चे चार्जर या फोंसोबतच मिळणार आहे. एवढ्या कमी किमतीच्या फोन्स मध्ये हि वैशिष्ट्ये क्वचितच कुठला ब्रँड आतापयंत देऊ शकला आहे. 

स्टोरेज क्षमता:

हा फोन 2GB RAM+32GB तसेच 4GB RAM+64GB या दोन व्हॅरिएंट्स मध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच, अधिकचे मेमरी कार्ड वापरण्यासाठी सिम ट्रे मध्ये मेमरी कार्ड साठी खास स्लॉट देण्यात आला आहे.

किंमत:

या फोनच्या बेसिक मॉडेलची किंमत रु. 6,999/- पासून सुरु होत आहे.

In note 1

प्रोसेसर आणि रॅम:

या फोनमध्ये MTK G85 हा ऑक्टाकोअर प्रोसेसर असून तो 2.0 गिगाहर्टझ वर काम करेल. त्याचबरोबर ARM G52 MC2 हा जीपीयू आपल्याला मिळणार असून हा फोन  4GB रॅमच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

डिस्प्ले:

या फोनला 6.67 इंचाचा डिस्प्ले असून याचे रिझोल्युशन 1080×2400 (FHD+) आहे. हा डिस्प्ले 21:9 या प्रमाणात असणार आहे. 

फ्रंट कॅमेरासाठी याला आकर्षक अशी पंच होल स्टाईल नॉच देण्यात आली आहे. 

कॅमेरा:

या फोनला मुख्य कॅमेरा हा 48 मेगापिक्सल आहे जो PDAF सह काम करील. त्याचबरोबर  5 मेगापिक्सल चा सेकंडरी कॅमेरा आहे जो वाईड अँगल फोटो काढू शकेल. मॅक्रो फोटोग्राफीची आवड असणारांसाठी यात एक 2 मेगापिक्सलचा खास सेन्सर असून आणखी एक 2 मेगापिक्सलचा सेन्सर डेप्थ सेन्सर म्हणून काम करेल.. 

सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेल सेन्सर असलेला कॅमेरा वाईड अँगलसह देण्यात आला आहे.

बॅटरी:

हा फोन 5000mAh क्षमतेच्या बॅटरीसह उपलब्ध असून या किमतीच्या इतर फोन्स मध्ये नसणारे रिव्हर्स चार्जिंग तसेच सी-टाईप चार्जिंग पोर्ट यामध्ये दिलेले आहे. त्यामुळे चार्जिंग तसेच कम्प्युटरला डेटा ट्रान्स्फर कार्यासाखी कामे जलद गतीने होणार आहेत. मुख्य म्हणजे तुम्हाला 18 Watt चे चार्जर या फोंसोबतच मिळणार आहे. एवढ्या कमी किमतीच्या फोन्स मध्ये हि वैशिष्ट्ये क्वचितच कुठला ब्रँड आतापयंत देऊ शकला आहे. 

स्टोरेज क्षमता:

हा फोन 2GB RAM+32GB तसेच 4GB RAM+64GB या दोन व्हॅरिएंट्स मध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच, अधिकचे मेमरी कार्ड वापरण्यासाठी सिम ट्रे मध्ये मेमरी कार्ड साठी खास स्लॉट देण्यात आला आहे.

किंमत:

या फोनच्या बेसिक मॉडेलची किंमत रु. 10,999/- पासून सुरु होत आहे.

इतर महत्वाचे फीचर्स

या फोन्सना गूगल असिस्टंट साठी खास बटन देण्यात आले आहे. 

फिंगरप्रिंट सेन्सर मागच्या बाजूला देण्यात आला आहे.

या फोन्सना Bluetooth 5.0 सपोर्ट देण्यात आला आहे. 

फोन वापरताना काही समस्या अथवा बिघाड झाल्यास मायक्रोमॅक्स साठ मिनिटांत आवश्यक सेवा देण्याचे आश्वासन या फोनच्या बाबतीत देते. 

तसेच किमान दोन वर्षे अँड्रॉइड अपडेट्स पुरवण्याचे आश्वासनही मायक्रोमॅक्स या दोन्ही फोन्सच्या बाबतीत देत आहे. 

हे दोन्ही फोन्स एंट्री लेव्हल तसेच मिड रेंज सेगमेंट मधील इतर ब्रँड्सच्या फोन्सना नक्की टक्कर देऊ शकतील कारण एवढ्या कमी किमतीत फास्ट चार्जर, टाईप सी पोर्ट, रिव्हर्स चार्जिंग सुविधा तसेच तगडा  कॅमेरा आणि प्रोसेसर सारख्या वैशिष्टयपूर्ण बाबींसह हे फोन्स इतर प्रस्थापित ब्रॅण्ड्सच्या मानाने कमी किमतीत आपले फोन बाजारात उतरत आहेत. 

हे स्मार्टफोन्स flipkart.com या इ-कॉमर्स वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत. आता हे स्मार्टफोन्स ग्राहकांच्या किती पसंतीस पडतात हे पाहणे रोचक ठरणार आहे. 

आशा करूया मायक्रोमॅक्सने किंमत आणि वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल्स बरोबरच आपल्या आफ्टर सेल्स सर्व्हिसमध्ये सुद्धा सुधारणा केल्या  असतील. जेणेकरून ग्राहकांचा त्यांच्यावरचा विश्वास वाढवणे सोपे जाईल. 

Read also:

(Google Virtual visiting cards) गुगलने आणले डिजिटल व्हिजिटिंग कार्ड!

ASUS ROG Phone 3, एक दमदार गेमिंग फोन

Related posts

2 Thoughts to “मायक्रोमॅक्स in सीरिजचे दोन दमदार फोन लॉन्च.”

  1. I am not rattling good with English but I come up this real leisurely to read . Arleta Bartholomeo Hubert

  2. I have read so many articles or reviews about the blogger lovers but this article is truly a nice piece of writing, keep it up. Avis Mikel Kragh

Leave a Comment