Microsoft Office ला फ्री पर्याय कोणते?

Microsoft Office ला फ्री पर्याय

या लेखात आपण Microsoft Office ला फ्री पर्याय कोणते? हे जाणून घेऊ.

आपण बऱ्याचदा  आपल्या कामकाजाची बहुतांश कामे ही मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर करतो. मायक्रोसॉफ्ट वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट आणि प्रेझेंटेशन बनवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे एक उत्तम टूल आहे. परंतु मायक्रोसॉफ्ट ऑफिस विकत घेणे हे खूप महाग आहे. जर आपला व्यवसाय छोटा असेल किंवा आपल्याला घरगुती कामासाठी वर्ड प्रोसेसिंग किंवा स्प्रेडशीट बनवायच्या असतील तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस विकत घेणे हे महाग पडू शकते.

अशा वेळी अशी कोणती सॉफ्टवेअर्स आहेत जी आपल्याला कोणताही अतिरिक्त खर्च न करता वापरता येतील आणि मायक्रोसॉफ्ट Microsoft Office ला फ्री पर्याय उपलब्ध करून देतील? हे आज आपण पाहून घेणार आहोत.

Libre Office

Libre Office हे  ‘डॉक्युमेंट फाउंडेशन’ यांचे उत्पादन आहे.  हे सॉफ्टवेअर मोफत आणि ओपन सोर्स आहे यामध्ये आपल्याला वर्ड प्रोसेसर, स्प्रेडशीट आणि प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर मिळते. तसेच हे जगातील 110 भाषांमध्ये उपलब्ध आहे. 

Libre Office हे ओ डी एफ फॉरमॅट मध्ये काम करत असले तरीही इतर अनेक फाईल फॉरमॅट या ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत.  जसे की आपला नेहमीचा मायक्रोसॉफ्ट ऑफिस चे फॉरमॅट. 

लिब्रे ऑफिसचे अँड्रॉइड ॲप सुद्धा उपलब्ध आहे. 

हे सॉफ्टवेअर आपल्याला आपल्या फाईल पीडीएफ फॉरमॅटमध्ये एक्स्पोर्ट करण्याचा पर्याय उपलब्ध करून देते

आपल्याला आपल्या कामाला लागणारे वैशिष्ट्यपूर्ण प्लगिन्स सुद्धा या ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत जी आपण आपल्या गरजेनुसार इन्स्टॉल करून वापरू शकता. 

त्याचबरोबर या ऑफिसमध्ये आपल्या कामाच्या स्वरूपानुसार  भरपूर टेम्प्लेट्स  उपलब्ध आहेत ते आपण वापरू शकता.

Libre Office हे नक्कीच मायक्रोसॉफ्ट Microsoft Office ला फ्री पर्याय म्हणून आपण वापरू शकता.
Download Libre Office

Free Office 

जर तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ऑफिस सारखाच दिसणारे फ्री सॉफ्टवेअर हवे असेल तर फ्री ऑफिस हे एक उत्तम पर्याय ठरेल.  सॉफ्टमेकर कंपनी हे सॉफ्टवेअर 1987 पासून उपलब्ध करून देत आहे.

घर किंवा ऑफिस या दोन्ही ठिकाणी वापरता येईल असे हे सॉफ्टवेअर असून हे विंडोज आणि लिनक्स या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. त्याचप्रमाणे अँड्रॉइड साठी सुद्धा यांचा एक बेसिक व्हर्जन उपलब्ध आहे

सर्वात चांगली गोष्ट अशी की हे सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट ऑफिस च्या सर्व प्रकारच्या फॉरमॅट अत्यंत चांगल्या प्रकारे सपोर्ट करते. तुम्ही या सॉफ्टवेअरवर अगदी ‘.xls’  आणि ‘.ppt’  या जुन्या प्रकारच्या फाईल्स सुद्धा ओपन आणि एडिट करू शकता

याचे नवीन वर्जन उपलब्ध झाला आहे त्यामध्ये आपण जुन्या प्रकारच्या  क्लासिक मेनू किंवा नवीन प्रकारचा रिबन मेनू या दोन्ही प्रकारांमध्ये काम करू शकता. तसेच हे सॉफ्टवेअर तुम्हाला टच स्क्रीन कम्प्युटर साठी काम करण्यासाठी एक वेगळा इंटरफेस अवेलेबल करून देते. ज्यामध्ये मेनू  टच स्क्रीन ला वापरण्यास योग्य रचनेमध्ये उपलब्ध आहेत. 

Download Free Office

WPS Office 

अँड्रॉइडसाठी आपणा डब्ल्यू पी एस ऑफिस तुम्हाला कदाचित माहीत असेल. परंतु त्यांचं हे कम्प्युटरसाठीचं व्हर्जन सुद्धा आहे जे आपल्याला खूप चांगले फिचर उपलब्ध करून देते. हे सॉफ्टवेअर लिनक्स, अँड्रॉइड आणि विंडोज तीनही प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते.

हे फ्री आणि पेड असे दोन प्रकारच्या उपलब्ध आहे. फ्रि व्हर्जन मध्ये तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ऑफिस प्रमाणे वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉइंट तर मिळतातच, पण त्याचबरोबर पिडीएफ(PDF) कन्वर्टरसह स्प्लिट आणि मर्ज ह्यासारखे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत.

फ्री व्हर्जन  मध्ये आणखी एक मिळणारा चांगलं फिचर म्हणजे तुम्हाला एक जीबी पर्यंत क्लाऊड स्टोरेज मिळते. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या कुठल्याही पीसी वर बसून तिथे असलेल्या WPS ऑफिसमध्ये लॉग-इन केलेत तर तुम्हाला तुमच्या अकाउंट वर असलेल्या फाईल्स आरामात मिळून जातात

Calligra

कॅलिग्रा ऑफिस सूट हे 2000 मध्ये ‘के ऑफिस’ या सॉफ्टवेअरचा एक पार्ट म्हणून उपलब्ध केले होते. हे सॉफ्टवेअर ऑफिस बरोबर ग्राफिक आर्ट साठी सुद्धा उपयोगात येऊ शकते.

यात बरेचसे मेनू रिबनमध्ये न देता आपल्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला दिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला डॉक्युमेंट फुलस्क्रीन मध्ये दिसत नाही.

ह्यातले अधिकचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रोजेक्ट मॅनेजिंग टूल तसेच माईंड मॅपिंग(Mind Mapping)टूल सुद्धा उपलब्ध केलेले आहे. ज्यासाठी आपल्याला बऱ्याचदा अधिकचे पैसे खर्च करावे लागतात. 

पण या सॉफ्टवेअरच्या सर्वात मोठा मर्यादा अश्या की हे सॉफ्टवेअर तुमचे .doc  किंवा .docx फक्त रीड करू शकते पण यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल करता येत नाहीत. त्यामुळे तुमच्याकडे जर मायक्रोसॉफ्ट ऑफिस डॉक्युमेंट्स असतील तर ते ओपन डोक्युमेन्ट फॉरमॅट(.ODF) मध्ये बदलणे गरजेचे होते. 

Download Calligra

Open Office 

ओपन ऑफिस हे खूप 2002 पासून मायक्रोसॉफ्ट ऑफिसला एक पर्याय म्हणून वापरले जाते. फाईल सेव्ह करण्यासाठी हे मुख्यतः: ODF या फॉरमॅटचा वापर करते. ओपन ऑफिस हे अजूनही जुन्या प्रकारच्या मेनू बार या इंटरफेसवरच काम करते. त्यामुळे नवे मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरणाऱ्यांना ते वापरणे थोडे किचकट वाटू शकते. 

Download Open Office

Related posts

Leave a Comment