Refurbished Products रिफर्बिश्ड म्हणजे काय?

रिफर्बिश्ड उत्पादने म्हणजे काय?

आपण बऱ्याचदा टीव्ही किंवा इतर मीडियावर रिफर्बिश्ड उत्पादनांच्या जाहिराती बघत असतो. काही विक्रेते याला Renowened म्हणून सुद्धा विकतात. पण बऱ्याचदा रिफर्बिश्ड उत्पादने घेण्याबाबत आपल्या मनात शंका असतात.

याचे मूळ कारण की रिफर्बिश्ड आणि जुने/वापरलेली वस्तू यातील फरक आपल्याला नीटसा माहित नसतो तसेच यावर वॉरंटी किती आणि कश्या स्वरूपाची मिळेल याबद्दल आपल्या मनात अनेक शंका असतात.

आज आपण याच प्रशनांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

उत्पादने रिफर्बिश्ड म्हणून का विकली जातात?

हा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला पडतो की ‘नव्यासारखे’ असलेले एखादे उत्पादन लक्षणीयरीत्या कमी किमतीत का विकले जाते?

यासाठी आपण एक उदाहरण पाहुयात. समजा, तुम्ही एखाद्या ब्रॅण्डचा लॅपटॉप ऑनलाईन विकत घेतलात. डिलिव्हरीनंतर जेव्हा तुम्ही तो वापरण्यास सुरुवात केली तेव्हा तुमच्या लक्षात आले की त्याचा वेबकॅम नीट चालत नाही त्यामुळे तुम्हाला व्हिडीओ कॉल सारख्या कामांमध्ये अडचण येते. अशावेळी तुम्ही संबंधित इ-कॉमर्स वेबसाईटवर तो लॅपटॉप बदलण्यासाठी(Replace) किंवा तुमची पूर्ण ऑर्डर रद्द करून तो लॅपटॉप परत करण्यासाठी कंपनीकडे दावा केलात. या परिस्थितीमध्ये तुम्ही परत केलेला लॅपटॉप हा त्याचा वेबकॅम बदलून पुन्हा ‘नवीन’ म्हणून न विकता ‘रिफर्बिश्ड’ म्हणून विकला जाईल. याच कारणाने बऱ्याचदा रिफर्बिश्ड म्हणून विकलेली उत्पादने खूप कमी वापरलेली किंवा जराही न वापरलेली असतात.

मोठे ब्रॅण्ड्स हे आपल्या उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत अत्यंत काटेकोर नियम पाळतात त्यामुळे बऱ्याचदा त्यांना वाहतुकीदरम्यान आलेले ओरखडे सुद्धा एखादे उत्पादन रिफर्बिश्ड म्हणून विकावे लागते. आणि हेच कारण आहे ज्यामुळे आपल्याला रिफर्बिश्ड उत्पादने इतक्या चांगल्या स्थितीत असूनही कमी किमतीत विकली जातात.

रिफर्बिश्ड उत्पादनांमध्येही ब्रँड रिफर्बिश्ड(Brand Refurbished) बरोबरच, ओपन बॉक्सOpen Box) तसेच लाईक न्यू(Like New) प्रकरची उत्पादनेही मिळतात, त्याबद्दल आणखी माहिती घेऊ.

Read Also: https://stepupmarathi.com/google-kormo-jobs/

ब्रँड रिफर्बिश्ड(Brand Refurbished)

या प्रकारातील उत्पादने ही त्यांच्या उत्पादकानेच दुरुस्त करून विक्री केलेली असते. बऱ्याचदा यांची किंमत इतर रिफर्बिश्ड उत्पादनांपेक्षा थोडी जास्त असू शकते.

ओपन बॉक्स(Open Box)

या प्रकारातील उत्पादन हे बऱ्याचदा ना वापरलेले असते. ग्राहकाने काही कारणास्तव परत केलेली उत्पादने या प्रकारात विकली जातात. बऱ्याचदा फक्त आऊटडेटेड झालेली उत्पादनेही या प्रकारात विकली जातात जी वापरलेली नसतात.

लाईक न्यू(Like New)

अगदी क्षुल्लक दुरुस्ती केलेली, बाहेरून कुठेलेही ओखडे किंवा इतर खुणा नसलेली उत्पादने तुम्हाला ‘नव्यासारखी’ म्हणून विकली जातात.

Read Also: https://stepupmarathi.com/google-photos-backup/

रिफर्बिश्ड आणि वापरलेल्या उत्पादनातील फरक (Refurbished vs Preowned)

रिफर्बिश्ड आणि वापरलेल्या उत्पादनातील मूळ फरक हाच आहे की रिफर्बिश्ड उत्पादने ही जुन्या/वापरलेल्या उत्पादनांपेक्षा कमी वापरलेली आणि चांगल्या स्थितीत असतात. जुन्या/वापरलेल्या वस्तू या जश्या आहे तश्या स्वरूपात आपल्याला विकत घ्याव्या लागतात याउलट रिफर्बिश्ड वस्तू या जाणकार टेक्निशियन्सद्वारे दुरुस्त केलेल्या असतात किंवा त्यांचे खराब भाग बदललेले असतात. त्याच बरोबर जुन्या/वापरलेल्या उत्पादनांवर तुम्हाला वॉरंटी मिळण्याची शक्यता जरा कमी असते.

बरेचसे ब्रँड्स हे त्यांची उत्पादने स्वतः दुरुस्ती करून विकत असतात त्यामुळे तुम्हाला ब्रँड वॉरंटी मिळू शकते.

रिफर्बिश्ड उत्पादने ही शक्यतो ‘जुन्या/वापरलेल्या’ वस्तूंपेक्षा अलीकडच्या काळात बाजारात आलेल्या असतात त्यामुळे आपल्याला तुलनेने नवे तंत्रज्ञान मिळते.

रिफर्बिश्ड उत्पादने घेताना घ्यायची काळजी

रिफर्बिश्ड उत्पादने घ्यायची असल्यास ब्रँडेड घ्यावीत.

वॉरंटी बद्दल नीट माहिती घ्यावी.

ब्रँड रिफर्बिश्ड मॉडेल मिळत असल्यास उत्तम, अर्थात हे थोडेसे महाग असू शकते.

रिफर्बिश्ड उत्पादने घ्यायची असल्यास वेबसाईट्स 2Gud , SSK Computer, Amazon

Related posts

Leave a Comment