SSC/HSC दहावी बारावीचे मार्कशीट कसे मिळवावे?

How to download SSC/HSC Result or Marksheet?

तुमचे महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळ दहावीचे किंवा बारावीचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र हरवले आहे?

किंवा

तुमच्या कंपनीत/कार्यालयात नव्याने रुजू होणाऱ्या व्यक्तीची दहावी-बारावीची प्रमाणपत्रके तुम्हाला बोर्डाकडून तपासून घ्यायची आहेत?

तर तुमच्यासाठी महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळाने ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

ज्यांची प्रमाणपत्रे किंवा गुणपत्रके हरवली आहेत किंवा त्यांना त्यांच्या पीडीएफ स्वरूपात प्रति हव्या आहेत, अश्यांसाठी हि सुविधा खूप कामाची ठरेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल याची माहिती आपण आज या लेखात घेणार आहोत.

आवश्यक माहिती

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे एक चालू इ-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, परीक्षेचा आसन क्रमांक आणि परीक्षेत मिळालेले एकूण गुण एवढे तपशील असणे गरजेचे आहे.

प्रक्रिया

A. खाते तयार कसे करावे?

 1. प्रथमतः महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळाच्या वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा.
 2. या वेबसाईटवर आल्यावर डाव्या बाजूला Create New Account या बटनावर क्लिक करून आपले नवे खाते तयार करण्यासाठीच्या अर्जावर जा.
 3. आता उघडलेल्या अर्जात नाव, श्रेणी(Category) मध्ये तुम्हाला स्वतःचे प्रमाणपत्र हवे असल्यास Individual निवडा, शाळेसाठी हवे असल्यास Institute आणि इतरांचे प्रमाणपत्र व्हेरिफाय करायचे असल्यास Other हा पर्याय निवडा.
 4. पुढच्या पर्यायात तुम्हाला फक्त दहावी/बारावीचे प्रमाणपत्र हवे की दोन्ही यानुसार SSC/HSC/SSC&HSC Both यापैकी एक पर्याय निवडा.
 5. पुढे तुमचा चालू मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी द्या.
 6. तुम्हाला हवा असलेला पासवर्ड टाईप करा(पासवर्डमध्ये किमान एक कॅपिटल अक्षर, किमान एक लहान इंग्रजी अक्षर, किमान एक अंक आणि किमान एक स्पेशल कॅरेक्टर उदा. @#$%*& असावेत)
 7. सर्वात शेवटी दिलेला कॅप्चा कोड भरून त्याखाली असलेलीच चेकबॉक्स ला क्लिक करा आणि रजिस्टर बटनावर क्लिक करा
 8. यानंतर तुम्हाला तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी टाका आणि पूढे जा.

झालं तुमचं खातं तयार.

B. आपले प्रमाणपत्र कसे मिळवावे?

 1. आता तुम्ही दिलेला इ-मेल आयडी पासवर्ड वापरून पुन्हा लॉगिन करा.
 2. वेब पेजच्या वर VERIFY SSC/10th MARK SHEET आणि VERIFY HSC/12th MARK SHEET हे पर्याय दिसतील. यातील तुम्हाला हवा तो पर्याय निवडा.
 3. आता अनुक्रमे परीक्षेचे वर्ष, महिना, सीट क्रमांक आणि एकूण गुण टाकून कॅप्चा टाका आणि आणि सबमिट बटनावर क्लिक करा.

 4. आता तुम्हाला तुमचे गुणांचे पूण तपशील स्क्रीनवर दिसतील आणि त्याखाली गुणपत्रिका(Marksheet) आणि प्रमाणपत्र(Board Certificate) डाउनलोड करण्यासही बटणे दिसतील. आता तुम्हाला हवे त्या पर्यायाला क्लिक करून तुम्ही आपले प्रमाणपत्र/गुणपत्रक डाउनलोड करू शकता.

C. आपल्या प्रमाणपत्रातील इ-स्वाक्षरी प्रमाणित कशी करावी?

(How to validate Digital Signature)

 1. आपल्या प्रमाणपत्रात खाली उजव्या बाजूला असलेली डिजिटल स्वाक्षरी पिवळ्या प्रश्नचिन्हात दर्शवलेली असेल तीला राईट क्लिक करा.

 2. आता Signature Validation Status विंडो मध्ये Signature Properties या बटनावर क्लिक करा.

 3. पुढे Certificate Viewer विंडो मध्ये Trust या टॅब मध्ये आल्यावर Add to Trusted Certificates या बटनावर क्लिक करा.

 4. समोर आलेल्या सूचनेतील OK या बटनावर क्लिक करा.

आता तुमच्या प्रमाणपत्रावरील इ-स्वाक्षरी हिरव्या रंगाच्या खुणेने दर्शवली गेलीअसेल म्हणजेच प्रमाणित झाली आहे.

Read Also..नोकरी ते उद्योजकता: एक ध्येय वेडा प्रवास!

Related posts

Leave a Comment