(SSD vs HDD) तुमच्या कम्प्युटरचा वेग खूप कमी झालाय का?

SSD vs HDD

(SSD vs HDD) तुमच्या कम्प्युटरचा वेग खूप कमी झालाय का? खास करून तो चालू होताना किंवा एखादे सॉफ्टवेअर चालू होताना खूप वेळ घेतो का? मग हे वाचाच!

(SSD vs HDD) तुमच्या कम्प्युटरचा वेग खूप कमी झालाय का? तुमच्या कम्प्युटरची रॅम आणि प्रोफेसर दोन्ही आधुनिक असूनही ही समस्या येते आणि तुम्ही सर्व काही करून पाहिले तरीही तुमचा कम्प्युटर चालू व्हायला वेळ घेतोय. किंवा कुठलेही मोठे सॉफ्टवेअर किंवा मोठी फाईल ओपन करताना वेळ घेतो. असे असल्यास त्याला कारण तुमच्या कम्प्युटरचा प्रोसेसर किंवा रॅम नसून तुमचे स्टोरेज डिवाइस असू शकते. आता तुम्ही म्हणाल की कम्प्युटरच्या स्पीडचा आणि स्टोरेज याचा काय संबंध येतो? पण खरं पाहायला गेलं तर आपल्या कम्प्युटरचे स्टोरेज कुठल्या प्रकारचे आहे यावरही आपल्या कम्प्युटरचा वेग अवलंबून असतो. चला तर आज आपण पाहूया स्टोरेजमध्ये नक्की काय बदल केल्याने तुमच्या कम्प्युटरचा वेग वाढू शकतो.

(SSD vs HDD)अलीकडच्या काळात वापरल्या जाणाऱ्या दोन प्रकारच्या स्टोरेजची माहिती आपण घेऊया. 

आपण आतापर्यंत शक्यतो हार्डडिस्क ड्राइव्ह याप्रकारचा स्टोरेज वापरत आलोय.  यामध्ये CD किंवा DVD प्रमाणे  धातूचा चकत्यांवर आपला डेटा साठवला जातो. पण यामध्ये समस्या ही हार्डडिस्कवर हा डेटा सेव्ह होत असताना जास्त वेळ घेतो. त्यामुळे आपला कम्प्युटर मंद गतीने चालतो.

जो नियम डेटा साठवण्यासाठी करण्यासाठी  तोच नियम डेटा वाचण्यासाठीसुद्धा लागू होतो. म्हणजे आपली हार्डडिस्क जेवढ्या वेगाने राईट करेल किंवा जेवढ्या वेगाने तो रीड करेल तेवढ्या वेगाने आपला कम्प्युटर चालेल. कारण आपले कुठलेही सॉफ्टवेअर किंवा ऑपरेटिंग सिस्टम हे त्या त्याच्या हजारो फाईल्स वर काम करत असते आणि आपल्याला मॉनिटरवर तो डेटा दाखवत असते. अशावेळी जेव्हा कम्प्युटरला हार्ड डिस्ककडून डेटा वेगाने मिळतो तेव्हा आपला कम्प्युटर जास्त वेगाने चालतो. पण हाडडिस्कच्या कमी वेगामुळे यामुळे हा डेटा रॅम आणि प्रोसेसरला लवकर मिळत नाही. त्यामुळे तो आपल्याला सादर व्हायला वेळ लागतो आणि आपण म्हणतो की आपला कम्प्युटर कमी वेगाने चालतोय.

एस.एस.डी. काम कशी करते?

अलीकडच्या काळात एस.एस.डी. हे  हार्डडिस्क पेक्षा नवीन असलेला स्टोरेज चा प्रकार आहे. एस.एस.डी.चे  पूर्ण नाव सॉलिड स्टेट ड्राईव्ह आहे. याचा अर्थ असा होतो की आपल्या एस.एस.डी. मध्ये कुठल्याही प्रकारची डिस्क नसते ह्यात डेटा फ्लॅश मेमरी प्रमाणे आय.सी.(IC)  किंवा इंटिग्रेटेड सर्किट(Intigrated Circuits) मध्ये स्टोअर केला जातो. परिणाम स्वरूप हा डेटा रीड आणि राईट करण्यासाठी हार्डडिस्क पेक्षा कमी वेळ लागतो. याचा फायदा असा होतो की आपल्या ऑपरेटिंग सिस्टममला डेटा सादरीकरणासाठी किंवा त्यावर प्रक्रिया करण्यासाठी लवकर उपलब्ध होतो आणि  आपल्या कम्प्युटरचा वेग वाढतो.

एस.एस.डी. वापरल्याने सगळ्यात मोठा फरक हा पडतो की आपला कम्प्युटर चालू होण्यासाठीचा(Booting Speed) वेग खूप वाढतो त्याचप्रमाणे जर आपण मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ एडिटिंग किंवा फोटो एडिटिंग साठी लागणारे सॉफ्टवेअर वापरत असाल असे की अडॉबी फोटोशॉप, अडॉबी प्रीमियर प्रो, अडॉबी आफ्टर इफेक्टस तर ह्या सॉफ्टवेअरला चालू होण्यासाठी लागणारा वेळ तसेच ऑपरेट करताना येणाऱ्या अडचणी खूप कमी होतात. या याप्रकारची सॉफ्टवेअर एस.एस.डी.वर असल्यास ती हार्डडिस्कच्या तुलनेने खूप वेगाने चालतात. 

एस.एस.डी. किती क्षमतेची घ्यावी?

खरंतर किमती पाहता एखाद्या हार्ड डिस्कच्या क्षमतेची एस.एस.डी. वापरणे हे खूप महाग असू शकते. यावर पर्याय म्हणून आपण फक्त ऑपरेटिंग सिस्टम आणि आपली सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी एस.एस.डी. वापरुन आपल्या फाइल्स स्टोअर करण्यासाठी हार्ड डिस्क चा पर्याय वापरू शकता. जर आपण फोटोशॉप किंवा प्रीमियर प्रो सारखी किंवा इतर व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर वापरणार असाल तर किमान 256 जीबी क्षमतेची एसडी वापरणे सोयीस्कर ठरेल. जेणेकरून आपली ऑपरेटिंग सिस्टम आणि सॉफ्टवेअर सह त्या सॉफ्टवेअरद्वारे वापरल्या जाणाऱ्या  लागणाऱ्या स्क्रॅच डिस्क सुद्धा एस.एस.डी. च्या पार्टिशन मध्ये ठेवता येतील. आपल्याला लागणाऱ्या फोटो आणि व्हिडीओ फाईल्स आपण स्वतंत्र हार्डडिस्क मध्ये साठवून ठेवू शकतो. असे केल्याने आपला स्टोरेज साठी लागणारा खर्च कमी येईल त्याचबरोबर आपल्याला हवा तसा वेगही मिळेल.

आता आपण हार्ड डिस्क आणि एस.एस.डी. यांच्यातील काही फरक पाहूया. 

१)हार्ड डिस्क ड्राइव्ह पेक्षा एस.एस.डी.चा वेग जास्त असतो. 

२)हार्ड पेक्षा एस.एस.डी. आकाराने तसेच वजनानेही कमी असते. 

३)हार्ड डिस्क स्टोरेज क्षमतेच्या मानाने एस.एस.डी पेक्षा महाग मिळते.

४. एस.एस.डी.फाईल ट्रान्स्फर किंवा रीड राईट वेग २०० ते ३६०० mb प्रति सेकंद असू शकतो याउलट हार्डडिस्क तुम्हाला जास्तीत जास्त ४८० mb प्रति सेकंद इतका वेग देऊ शकते. (दोन्हींचे वेग तुमच्या रॅम आणि प्रोसेसरच्या वेगानुसार कमी जास्त असू शकतात).

५. एस.एस.डी. वापरात असल्यास तुम्हाला हार्ड डिस्क पेक्षा खूप कमी वेळा डिस्क डिफ्रॅगमेंटेशन करण्याची गरज भासते. 

६. हार्डडिस्कवर चुंबकीय क्षेत्राचा परिणाम होऊ शकतो याउलट एस.एस.डी.वर याचा प्रभाव पडत नाही.

नवा कम्प्युटर घ्यायचाय? मग हे नक्की वाचा :Intel or AMD कुठला प्रोसेसर निवडावा?

Related posts

Leave a Comment