Stand Up India स्टँड अप इंडिया योजना

Stand Up India स्टँड अप इंडिया योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०१६ मध्ये देशातील अनुसूचित जाती, जमातीतील तरुण आणि महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज देऊन उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहित करून ‘स्टँड अप इंडिया’ (Stand Up India) योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातुन महिला तसेच अनुसूचित जाती व जमातीमधील तरुण उद्योजक होऊ शकतील.

 

Stand Up India  योजनेची काही वैशिष्ट्ये 

 १. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती (SC )/ अनुसूचित जमाती(ST) आणि महिला उद्योजकांना  नवीन प्रकल्प किंवा ग्रीनफिल्ड प्रकल्पांसाठी दहा लाख रुपयांपासून  एक कोटी रुपयापर्यंतची  कर्जे दिली जातात. 

स्टँड-अप इंडिया स्कीम: पात्रता                                                                                                                                                         

.ही. योजना केवळ महिला कर्जदार किंवा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या कर्जदारांसाठी उपलब्ध आहे. 

.अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

३. ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट (नवीन प्रोजेक्ट) उभारण्यासाठी स्टँड

अप इंडिया लोन घेता येतो.                 

४. जुन्या व्यवसायासाठी आपण कर्ज घेऊ शकत नाही.

५. आपला प्रकल्प व्यवसाय निर्मिती क्षेत्र (Manufacturing Sector) किंवा सेवा क्षेत्रात(Service Sector) असणे आवश्यक आहे.

 

स्टँड-अप इंडिया योजनेत किती कर्ज उपलब्ध आहे?

१. आपण १० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता.

२. आपण मुदती  कर्ज आणि खेळते  भांडवल कर्ज यापैकी एक किंवा दोन्ही घेऊ शकता.

३. जरी आपण दोन्ही प्रकारची कर्जे घेतली तर आपले एकूण कर्ज 1 कोटींपेक्षा जास्त असू शकत नाही.

४. लक्षात घ्या की या योजनेंतर्गत तुम्हाला प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या 75% पर्यंत कर्ज मिळू शकते.

५. आपण २५% रक्कम स्वतः गुंतवणे अपेक्षित आहे(यासाठी आपण इतर योजनांमधून अर्ज करू शकाल).

६. योजनेच्या नियमांनुसार, किमान १०% कर्जदाराला स्वत: चे पैसे गुंतवावे लागतील. 

 

स्टँड-अप इंडिया कर्जाचे व्याज दर काय आहेत?

१. सरकारने या योजनेचा व्याज दर किती असावा हे  निश्चित असे  केलेले नाही.

२. पण सरकारने  कर्ज घेणार्‍याच्या प्रवर्गानुसार किमान व्याज दराने कर्ज द्यावे, अशा सूचना बँकेला दिल्या आहेत.

३. तसेच, कर्जाचा व्याज दर Base Rate/MCLR + Tenure Premium + 3% पेक्षा जास्त असू शकत नाही.

 

स्टँड अप इंडिया योजना: कर्जाची परतफेड कालावधी

१. कर्जाची कमाल मुदत ७ वर्षे असते.

२.  बँक आपल्याला १८ महिन्यापर्यंत मुदतीच्या परतफेडीवर स्थगिती देऊ शकते

 

Stand up India  कर्ज अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?  

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • कोटेशन 
 • प्रकल्प अहवाल
 • जातीचे प्रमाणपत्र
 • आवश्यक असल्यास विशेष श्रेणी प्रमाणपत्र
 • ग्रामीण भागाचा दाखला
 • लोकसंख्या  प्रमाणपत्र
 • व्यवसाय ठिकाणच्या जागेची कागदपत्रे किंवा भाडेकरार 
 • शिक्षण / कौशल्य विकास प्रशिक्षण / 
 • बँक अकाऊंट 
 • प्राधिकरण पत्र     

 Stand up India ऑनलाइन अर्ज कसा करावा ?

१. स्टँड अप इंडिया पोर्टलद्वारे (https://www.standupmitra.in/) आपण स्टँड अप इंडिया कर्ज अर्ज ऑनलाईन प्रवेश करू शकता.

२. आपण नजीकच्या बँक शाखेमध्ये जाऊन देखील फॉर्म भरू शकता . 

३. Lead District Manager च्या सहाय्याने देखील भरू शकता.

 

 

https://www.standupmitra.in/Videos/Marathi_Applicant%20_Final%20Export_libtheora.ogv

Related posts

Leave a Comment