उद्यम रजिस्ट्रेशन(Udyam Registration)

udyam registration

उद्यम रजिस्ट्रेशन(Udyam Registration) बद्दल महत्वाचे १० मुद्दे.

एक जुलै २०२० पासून केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने महत्वाचे मानलेले उद्योग आधार हे प्रमाणपत्र रद्दबातल करून त्याजागी नवीन ‘उद्यम रजिस्ट्रेशन(Udyam Registration)’ची सुविधा सुरु केली आहे.

या नव्या घोषणेनंतर खूप उद्योजकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण आले आहेत त्याचबरोबर ज्यांना नव्याने उद्योग सुरु करायचे आहेत तसेच सुरु केलेल्या उद्योगाची नोंदणी करायची आहे.  अश्या उद्योजकांच्या मनातही विविध शंका आहेत. चला तर बघुया उद्यम रजिस्ट्रेशनची प्रक्रिया काय आहे आणि उद्यम रजिस्ट्रेशनची आणि उद्योग आधार यांच्यात काय फरक आहे.

१) उद्यम रजिस्ट्रेशन(Udyam Registration) कोणासाठी आवश्यक आहे?

उद्यम रजिस्ट्रेशन हे सर्व प्रकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम प्रकारच्या उद्योगांसाठी आहे. ही नोंदणी केल्यावर आपणांस उद्यम रजिस्ट्रेशन केल्याचे प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध होईल. सदर नोंदणी ही आपल्याला शासनाच्या विविध कर्ज योजना तसेच अनुदान योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरते. बर्याचदा तुम्हाला बँकेत चालू खाते (Current Account) उघडण्यासाठी सुद्धा उद्यम रजिस्ट्रेशनची मागणी केली जाऊ शकते.

२) उद्यम रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

उद्यम  रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक खाते गरजेचे आहे. इतर तपशील तुमच्या आयकर आणि जीएसटी यांच्या तपशिलावरून आपोआप घेतले जातील.

३) माझा उद्योग कोणत्या श्रेणीत येतो?

उद्योगांच्या श्रेणी त्यांच्या एकूण गुंतवणूक(Investment) आणि वार्षिक उलाढालीच्या(Turnover) रकमेवर अवलंबून आहे. त्यासाठी आपण खालील तक्ता पाहूया

अनुक्रमांकउद्योग श्रेणी गुंतवणूक(Investment)उलाढाल (Turnover)
सूक्ष्म उद्योग१ कोटी पेक्षा कमी५ कोटींपेक्षा कमी
लघु उद्योग१० कोटींपेक्षा कमी   ५० कोटींपेक्षा कमी
मध्यम उद्योग५० कोटींपेक्षा कमी २५० कोटींपेक्षा कमी

४) माझ्याकडे GST नोंदणी नाहीये, GST क्रमांक गरजेचा आहे का?

GST नोंदणी असणे आतातरी बंधनकारक नसले तरी ३१ मार्च २०२१ च्या आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

५) माझ्याकडे उद्योग आधार आहे, मला उद्यम रजिस्ट्रेशनची गरज आहे का?

ज्यांच्याकडे उद्योग आधार आहे त्यांना उद्यम रजिस्ट्रेशनची आतातरी बंधनकारक नसले तरी ३१ मार्च २०२१ च्या आधी आपल्या उद्योग आधारचा क्रमांक वापरून उद्यम रजिस्ट्रेशनची करणे गरजेचे आहे. म्हणजेच ३१ मार्च २०२१ नंतर तुमचे उद्योग आधार ग्राह्य धरले जाणार नाही.

६) कुठल्या क्षेत्रातील उद्योगांसाठी उद्यम रजिस्ट्रेशनची गरज आहे?

उत्पादन क्षेत्र (Manufacturing Sector) आणि सेवा क्षेत्र (Service Sector) साठीच उद्यम रजिस्ट्रेशनची सेवा उपलब्ध आहे.

७) मी व्यापारी (Traders) आहे, मला उद्यम रजिस्ट्रेशन करता येईल का?

उद्योग आधार प्रमाणेच सध्यातरी बहुतांश व्यापारी(Traders) वर्गासाठी ही सेवा उपलब्ध नाही.

८) सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील सर्वच उद्योग याचा लाभ घेऊ शकतील का?

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालयाने काही उद्योग या सुविधेतून वगळले आहेत त्यांची यादी आपणास येथे क्लिक केल्यास उपलब्ध होईल.

९) उद्योग आधार प्रमाणे मी किती उद्यम रजिस्ट्रेशन प्रमाणपत्रे मिळवू शकतो?

उद्योग आधार आणि उद्यम रजिस्ट्रेशन मधला मुख्य फरक हा आहे की आपण उद्योग आधार प्रमाणे कितीही प्रमाणपत्रे न काढता एकच प्रमाणपत्र काढू शकता. आपण करत असलेल्या सर्व प्रकारच्या उद्योगांचे तपशील आपल्या उद्यम रजिस्ट्रेशन प्रमाणपत्रात आपोआप नमूद होतील. (ही माहिती आयकर (Income Tax) आणि जीएसटी (GST) यांचे विवरणातूनआपोआप घेतली जाईल).

१०) माझे उद्यम रजिस्ट्रेशन करण्या आधी मी काय काळजी घ्यायला हवी?

सर्वप्रथम आपणास ज्या महत्वाच्या बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे ती म्हणजे आपला आयकर (Incom Tax) आणि जीएसटी (GST) यांचे विवरण आपल्या सीए (CA) कडून व्यवस्थित भरून घेणे गरजेचे आहे कारण हेच तपशील आपल्या उद्यम रजिस्ट्रेशनवर नमूद केलेले असतील.

उद्यम रजिस्ट्रेशन बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या मनात उद्यम रजिस्ट्रेशन बद्दल अजून काही शंका असल्यास आपण कमेंट बॉक्स मध्ये त्याबद्दल विचारू शकता.

Related posts

Leave a Comment