खूप अडथळ्यानंतर एकदाचे व्हाट्सएपच्या पेमेंट( WhatsApp Payments) सुविधेची सुरुवात आता भारतात होणार आहे. आजच व्हाट्सअप आणि फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबद्दल घोषणा केली आहे.
व्हाट्सअपने यासाठी National Payments Corporation of India (NPCI) शी संलग्न होऊन Unified Payment Interface (UPI) आधारित वर आधारित पेमेंट सिस्टम चालू केली आहे. यामुळे आता केवळ व्हाट्सअप वापरून आपण भारतातील जवळजवळ 160 बॅंकांमधील खात्यात व्यवहार करणे शक्य होणारआहे.
या सुविधेचा वापर करण्यासाठी आपल्याकडे स्वतःचे बँक खाते तसेच डेबिट कार्ड असणे आवश्यक आहे. ही सुविधा राबवण्यासाठी भारतातील चार आघाडीच्या बँका(ICICI Bank, HDFC Bank, Axis Bank, the State Bank of India) तसेच Jio Payments Bank बरोबर काम सुरु केले आहे.
व्हाट्सएपच्या इतर सुविधांप्रमाणे हि सुविधाही अत्यन्त सुरक्षित असल्याचे वक्तव्य यात व्हाट्सअपने केले आहे. तसेच यामुळे भारताच्या ग्रामीण भागातही सामान्य माणसांना आर्थिक व्यवहार करणे आता सोपे जाईल असा विश्वास व्हॅट्सऍपला वाटतो.
तूर्तास सगळ्याच युजर्सना हे अपडेट आले नसले तरी लवकरच भारतभर सर्व व्हाट्सअप युजर्सना ही सुविधा वापरणे जमणार आहे.
या सुविधेद्वारे पैसे पाठवण्यासाठी आपल्याला खालील पद्धतीचा वापर करावा लागेल.
आता पाहूया आपण व्हाट्सअपने पैसे कसे पाठवू शकतो.
अधीक माहितीसाठी आपण पुढील व्हिडीओ पाहू शकता.
याबाबतीत एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा UPI पिन कोणालाही सांगायचा नाहीये हे लक्षात असुद्या. तसेच आपले डेबिट कार्डचे तपशीलही कोणाला कळणार नाहीत याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. या दोन गोष्टींची काळजी घेतल्यास व्हॅट्सऍपद्वारे आपल्याला सुरक्षितपणे आर्थिक व्यवहार करणे सोपे होईल.
Read Also:
Good post. I am experiencing many of these issues as well.. Bren Cad Kenji
Great article. I am facing many of these issues as well.. Winny Roberto Angeline
You made some good points there. I viewed on the net for the problem and also found most individuals will certainly go along with with your web site. Maurine Quintin Hoskinson