(ZP Raigad Recruitment)जिल्हा परिषद रायगड आरोग्य विभाग २५५ पदासांठी भरती

जिल्हा परिषद रायगड आरोग्य विभागामध्ये विविध २५५ पदासांठी भरती. (ZP Raigad Recruitment) ह्या भर्तीसाठीचे अर्ज हे ईमेलद्वारे स्वीकारले जाणार आहेत.

ZP Raigad Recruitment पदांच्या अटी व शर्ती :

१. हि पदे निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असणार आहेत.

२. अर्जदारांनी आपला अर्ज वेबसाइट असलेल्या अर्जाच्या नमुन्यात टाइप करूनच पाठवायचा आहे.

३. अर्जासोबत : a) वयाचा पुरावा. b) शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र . c) शैक्षणिक अहर्ता शेवटच्या वर्ष्याची गुणपत्रिका. d) कौन्सिल प्रमाणपत्र e ) अनुभव दाखला

४. निवड झालेल्या उमेदवारांना कोविड १९ साठी नेमणूक देण्यात येईल.

५. हि निवड ३ महिन्यांसाठी किंवा कोविडची साथ असेपर्यंत असेल.

६. ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जावरून उमेदवारांची मेरिट लिस्ट लावण्यात येईल.

७. मेरीट लिस्ट तयार झाल्यावर https://raigad.gov.in/ या संकेतस्थाळावर प्रसिध्द करण्यात येईल.

८. अर्जदार शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा.

९. अर्जदारा विरुद्ध कुठलाही फौजदारी गुन्हा दाखल नसावा.

१०. सदर पदांची संख्या हि कमी जास्त होऊ शकते. याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.

११. शासकीय सेवेत नियमित रुजू करण्याबाबत उमेदवारांना कुठलाही दावा करता येणार नाही.

१२. उमेदवारांना आपल्या सोयीप्रमाणे बदली मिळणार नाही.

१३. मुलाखत होणार नसल्याने कुठल्याही उमेदवाराने कार्यालयात भेट देऊ नये.

१४. विहित नमुन्यात अर्ज उपलब्ध न झाल्यास असा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

१५. भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवाराने आपली माहिती चुकीची दिल्यास किंवा माहिती दडवुन ठेवल्यास अश्या उमेदवाराला कुठल्याही टप्प्यावर बडतर्फ करण्यात येईल.

क्र पद अर्हता पदसंख्या वयोमर्यादा 
फिजिशियनMD मेडिसिन /DNB ०६१८ ते ३८ वर्षांपर्यंत 
भुलतज्ञMD अनेस्थेशिया /DNB /DA ०६१८ ते ३८ वर्षांपर्यंत
वैद्यकीय अधिकारी (MBBS)MBBS७९७० वर्षांपर्यंत 
आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS)BAMS/BUMS ६३१८ ते ३८ वर्षांपर्यंत
हॉस्पिटल मॅनेजररुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.१३६५ वर्षांपर्यंत
स्टाफ नर्सGNM किंवा B.Sc (नर्सिंग)८५१८ ते ३८ वर्षांपर्यंत
क्ष-किरण तंत्रज्ञ सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ ०३१८ ते ३८ वर्षांपर्यंत
एकूण पदसंख्या २५५

वेबसाईट : येथे क्लिक करा.
जाहिरात : येथे क्लिक करा.
अंतिम दिनांक : १५ जुलै २०२०

फी  :  फी नाही. 
ई मेल आयडी  : csraigadcovid19@gmail.com

Related posts

Leave a Comment